Monday, December 01, 2025

श्री

 

श्री 

 

कुठलीही भूमिका घेणे आणि त्याचे स्पष्टीकरण देणे अभिप्रेत नसावे कधीच. सर्व अस्तित्व शक्तीमुळे होणारे घडामोडी असतात (in the phenomenal world), त्याला ओळखण्यासाठीचा मार्ग प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. तो मार्ग कसा, कधी, केव्हा, कुठल्या रूपात जाणवेल, ते सांगणे अवघड असते, म्हणून "तो मार्ग कळेल" अशी श्रद्धा वाढवत राहायला लागते. 

 

आपण मध्य भागात आहोत. आपल्याला अद्वैत आणि द्वैत, ह्या दोन्ही गोष्टींची _जाणीव_ आहे आणि आपले अनुभव निर्गुण आणि सगुण ह्या दोघांच्या अस्तित्वामुळे निर्माण होतात. निर्गुणातून सगुण प्रकट होते...किंव्हा निर्गुण सगुणात _अवतरते_ (it transforms), आणि त्या प्रक्रियेत स्मरण बदलत जाते. म्हणून आपण इथे कसे आलो, हे ध्यानी स्पष्ट कळत नाही...त्याचे उत्तर रूपातून मांडणे अवघड. सांगण्याचे तात्पर्य हे की रूप धारण केल्यामुळे आपण झालो आहोत. 

 

अस्तित्व आपल्यासाठी दुहेरी परिणाम करणारे आहे. आतील आणि बाहेरील _कार्य_ (reality), ह्यात संबंध येतात. "मन", हे दोन्ही स्थिती जोडणारे रसायन आहे. म्हणून सगळ्याचे ध्येय - विचार, भावना, कृती, इंद्रिये - हे एकच असते आणि ते म्हणजे भगवंत शक्ती जागी करणे किंव्हा ती आत्मसात करणे किंव्हा ती ओळखणे. त्याला दुसऱ्या भाषेत "सर्वांगीण परिवर्तन" म्हणता येईल. 

 

द्वैताची चिंता प्रज्वलित ठेवली तर तो गुंता कायम राहणार. अस्तित्व *स्वीकार* होणे आहे. म्हणजे आपण कोण, आपण इथे कसे आलो, आपण कुठे जाणार - ह्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तरे हवी. 

 

प्रश्न आयुष्यात असणार, कारण ते विधिलिखितच आहे. प्रश्न नसलेला माणूस अजून जन्मात यायचा आहे! तर प्रश्न टाळू नये आणि ते पुढेही ढकलू नये आणि त्यामुळे उतावळेही होऊ नये. प्रश्नांमुळे अस्तित्वाचे चिंतन होत राहील आणि सत्य कळून येईल.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

मी संपूर्ण दुसऱ्यांना कळायला हवा, अशी आपण अपेक्षा का करत राहतो?!!..

 

हे द्वैत ह्या परिस्थितीत होणे,अतिशय अवघड आहे आणि तशी अपेक्षाही ठेवणे हिताचे नाही. ह्याचाच अर्थ हा, की सर्व गोष्टींचे सत्य एका भगवंताकडे असते, द्वैताच्या कुठल्याही रूपाच्या हातात अर्थातच नाही! 

 

थोडक्यात इतरांची, द्वैताची, परिस्थितीची काळजी नसावी. घडामोडी होत राहतील. आज ही परिस्थिती तर उद्या ती...असे होत राहणारच. अशा सऱ्या गोष्टी आलटून पालटून होत राहणार. 

 

आपण स्थिर रहावे. गोष्टी बदलत गेल्या, त्यातून आपले कर्तृत्व आणि आपली भूमिका अवलंबून करू नये. त्यावर आपण (सत्य) ठरत नसतो. 

 

भगवंताचे चिंतन करत राहावे.

 

हरि ओम.

 

श्री 

 

अनुभवाचे स्थान काय असते? ज्याच्या त्याच्या हेतूवर ह्याचे उत्तर ठरते. 

 

माझ्या मते, अनुभव सिद्ध होण्यासाठी त्याचा वापर असू नये. त्यातून सिद्ध होणे अवघड, किंबहुना सिद्ध होणे ही वृत्ती अस्थिर भावना जागृत ठेवते, हे ध्यानात असू द्यावे. आपण पाहिजे ते सत्य मनात संक्रांत करू शकतो आणि त्या प्रमाणे परिस्थितीचा अर्थ निर्माण करू शकतो आणि त्यात वावरू शकतो, तसा भाव होऊ शकतो. अर्थात हे सर्व गूढ आहे, सरळ रेषेचा प्रकार नाही की बुद्धी वापरली आणि तसे घडले! स्वार्थापायी बुद्धी वापरली गेली तर त्याचा परिणाम भोगायला लागतोच, आणि तो कष्ट देतो, दुःख देतो. विश्वात व्यवस्था शक्तीची असल्यामुळे आपण केलेल्या कर्माचे किंव्हा निर्णयाचे फळे भोगायला लागतात. 

 

म्हणून असा विचार करावा की सर्व काही स्थिती, स्तर, स्वभाव, संबंध देवाने दिले आहेत आणि त्यातूनच अनुभव येतात. आपण देवाच्या घरी वावरत असतो. हे घर आणि त्यातील सर्व गोष्टी, संबंध, रूपे, आकार देवाचे असतात, म्हणून ह्या सर्वांचे काय करावे, हे तोच ठरवतो. 

 

जीव, प्रकृती, शांत स्थिती अशी आपली परिवर्तनाची दिशा असायला हवी. त्यासाठी तसा अभ्यास मनाने करायला हवा. _अभ्यास_ हा सर्वांगीण चिंतनाचा विषय आहे....मन शुद्ध होण्याचा. 

 

वरील गोष्टीतून काय निष्पन्न होते की एक तर बहिर्मुख प्रतिक्रिया देणे हा स्वभाव असतो. त्यातून अनंत गोष्टीनं आपण मुल्य देतो, चक्र प्रज्वलित ठेवतो, क्रिया करतो, गुंतून राहतो, परिणाम झेलतो, वगैरे. हा न संपणार प्रकार आहे आणि ह्यातून शांती मिळणे कठीण. परत परत, सतत तेच तेच करून शांतीच्या मार्गाच्या शोधात आपण जातो. दुसरी गोष्ट ही की चिंता करून कोडी सुटत नाही, कारण चिंता निर्माण करत राहणे, हेच तर रहस्य असते मनाचे! बऱ्याच विचारातील गोष्टी "संबंधित", "अपुरे", "बदलणारे", आणि सर्वांगीण येत राहतात. म्हणजे "चिंता" ही एका विचाराच्या चक्रातून निर्माण होते, "भीती" देखील विचाराच्या पद्धतीतून होते. म्हणून असे सांगतात की वृत्ती कुठे गुंतली गेली असते, हे ओळखावे कारण त्यातूनच अशा सऱ्या भावना येतात. 

 

असो, सांगण्याचे तात्पर्य हे, की विचार किंव्हा चिंतन भगवंताचे केले की त्या बरोबरीने एकंदरीत शांतीला पूरक विचार येत राहतील आणि तशी भावना होत जाईल. म्हणजे विचार शक्ती हा न संपणारा किंव्हा मर्यादित न राहणारा आणि सर्व स्तरात मिसळणारा प्रकार ओळखावा. म्हणून शांत विचार प्रकट होणे ह्याचा अर्थ की श्रद्धा वाढवणे. 

 

श्रद्धा फक्त संकल्पना नाही, तर ते सत्यात आपण आणू शकतो. जो दर्जा विचाराला देतो, तोच श्रद्धेला द्यावा, नाही का?!!...

 

हरि ओम.

 

 

Shree 

 

Experiences, according to me, are ambiguous and don't display exact words or compartments. They are all over the place, they are present in all states, they are _of_ space and time and of various scales, transitions, changes, buffers, and so on. 

 

 _Awareness_ of reality doesn't depend on accurate words for describing or mapping experiences. Experiences will always "tend to slip" from the _form_ of words and i believe that not all experiences can get described as such. 

 

Determinism of experiences into architecture - loosely said as a function or technology or a purpose, is a 'death dealer' according to me. That means perhaps reducing experiences into some acceptable _form_ of popular "imagination - access", often perhaps implies that all of humanity should make sense of! It's quite a stupid idea implying that even the dumbest of people should "get the thing right in the least amount of time". 

 

It is a blunder to imagine architecture in that manner. Life can't be reduced to performance, efficiency, output, material gains, algorithms and so on. It is criminal to do so and expect others to do so! 

 

If anyone can believe in magic, (which is real by the way), life can be magical and delightful and the same tendencies can inform architecture. I don't find any reason why poems or writings or plays should get excluded from imagining spaces and more sources of inspiration, the better it is!

 

Hari Om.

 

 

श्री

श्री 

अस्तित्वात  (दृश्यात) आलो असल्यामुळे त्या स्तराचा स्वभाव किंव्हा परिणाम होत राहतो. निर्गुण आणि सगुणाच्या संबंधातून दृश्याचे अनुभव मनात येऊ पाहतात आणि त्या अनुभवाचे स्मरण होते. हे होणे भगवत इच्छा मानावी किंवा स्वीकारावी आणि त्याची _चिंता_ करू नये. 

सर्व विचार आणि भावना प्रकृतीचा परिणाम आहे. अध्यात्म ह्याला "खेळ", अशी उपमा देते कारण विस्मरण का होते, हे ठाऊक नाही. स्मरण किंव्हा विस्मरण सोडविण्याचे कोडे बुद्धीच्या _पलीकडे_ असते, म्हणून श्रद्धेचे स्थान असते आणि कृपेची गरज असते. जो पर्यंत हे होण्याला आपला भाव "खेळेसारखा" होत नाही, तो पर्यंत ह्या खेळाचा परिणाम आपण व्ययक्तिक करतो आणि कष्टी होतो. 

आपले विचार आणि भावना देवाकडून अवतरतात, म्हणून मूळ कार्य त्याचेच. अध्यात्म जाणिवेचा परिणाम कसा करावा, कसा होईल, कधी होईल, कुठल्या रूपात होईल, हे प्रश्न काही महत्वाचे नाहीत, कारण परिवर्तन योग्यच होईल. जाणीव शुद्ध झाली की योग्यच परिणाम होतो. इथे परिणाम शब्द व्यापक आहे, स्वतःशी निगडित नाही. 

म्हणून सर्व चक्राचा परिणाम बाजूला करावा, सूक्ष्म व्हावे आणि शांत व्हावे.

हरि ओम.


श्री 

वेग असल्यामुळे त्याचे स्मरण असते, त्याचा परिणाम असतो आणि आकारात अवतरण्याची क्रिया असते. 

मूळ अस्तित्व शक्तीचे परिणाम आहेत. त्यातून स्मरणेच्या प्रकारामुळे किंव्हा क्रियेमुळे आकार होत राहतात. आकार होणे, हे होणार...तशी भगवत इच्छा आहे, म्हणून ते होऊ द्यावे, अडवू नये, शंका घेऊ नये. सर्व आकाराचे बीज सर्वांना एकच असते, म्हणून सर्व आकार संबंधित असतात. संबंध शांतीने होऊ द्यावे, हेतू ठेवून नाही. 

शक्ती अवतरून आकार होऊ पाहणे, ते बदलत राहणे, ते विरघळून जाणे, हे त्याचे कार्य ओळखावे. म्हणजे त्याला काही "कारण" लागत नाही, की असे का स्थित असते. मनुष्य जीव कारण शोधतो, म्हणून त्रास होतो. जेव्हा कारणेची जागा श्रद्धा घेते, तेव्हा शांतीने घडामोडी स्वीकारल्या जातात. 

श्रद्धा वाढवणे आपल्यासाठी योग्य आहे. तसा अभ्यास करावा.

हरि ओम.

Friday, November 28, 2025

श्री

 

श्री 

 

स्वतःचे रहस्य _गूढ_ आहे आणि ते अनेक गोष्टीतून "प्रकट" होत असते - जसे की स्थिती, स्तर, संबंध, भाव, वृत्ती, विचार आणि भावना चक्र, अनुभव, परिणाम आणि त्यामुळे होऊ पाहणारे स्मरण. इथे "मी" कुठे आहे, असे जर विचारले, तर हाथी काही लागणार नाही! म्हणजे गोष्ट किंव्हा रूप किंव्हा आकार ही संकल्पना असते (a construct), प्रत्यक्ष तिला तसा _स्वतंत्र_ अस्तित्व नाही! ह्याचाच अर्थ की _क्रियेतून_, प्रवाहातून, संबंधातून ती "गोष्ट" ध्यानात अवतरते किंव्हा प्रकट होते आणि बदलत राहते! म्हणजे क्रिया होत राहणे (ज्याला कार्य संबोधले आहे) ते स्थित असते अस्तित्वात. अस्तित्व म्हणजे कार्य. 

 

स्वतःची गोष्ट इथं पर्यंत मर्यादित राहत नाही अर्थातच. त्या प्रक्रियेत अनुभवाचे स्वरूप किंव्हा स्मरणाचे रूप जे होते, त्याला _द्वैत_ म्हणतात. त्या अनुभवात अनेक रूपे आणि आकार येत राहतात आणि निघून जातात आणि त्यात आपण गुंतून राहतो. ह्याचा असाही अर्थ होतो की गुंतणे देखील खूप गूढ क्रिया आहे जिचा उगम सूक्ष्मातून होतो म्हणून तो ध्यानी यायला वेळ लागतो आणि तो सारे रूपाच्या पलीकडे उगम पावतो. शिवाय गुंतून राहणे म्हणजे स्मरणाचे रूप. स्मरण मर्यादित असले (रूपावर आणि आकारावर निगडित) तर गुंतून रहाण्याचे रूप घट्ट होते; स्मरण जर प्रवाहाचे असले किंव्हा सूक्ष्माचे झाले, तर गुंतणे क्रिया विलीन होते.

 

आता ह्या वरील कार्याला मी विषय म्हणून बघू शकतो, ज्यामुळे व्याकुळता, बेचैनी, अट्टाहास, अपेक्षा असे भावना प्रकट होऊ पाहतात.... 

किंव्हा मी वरील कार्याला शांतीने स्वीकारण्याचा निर्णय घेऊ शकतो, ज्यामुळे समाधान भाव कधीतरी लाभू शकते. 

 

वरील कार्य होतच राहते, हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे. ते स्थित असतेच आणि त्या प्रवाहात _एखादे_ रूप म्हणजे आपण होऊ पाहतो, बदलत राहतो आणि निघूनही जातो. 

 

हरि ओम.

 

 

Shree 

 

Process and messiness of arriving at a synthesized form is integral in our learning experience. This happens because of vibrations, memory, our own tendencies and connections. To skip messiness and state a final product is ridiculous and i feel, impossible and non digestible. 

 

Therefore in life, all situations, which come to be experienced,  are crucial to _lead_ to a synthesis. So accept all that there is. 

 

Secondly, messiness and that getting streamlined takes its own time. That is the Ordering principle. And how should that get streamlined or synthesized is each one's _language_ of being aware. So by default, that should _also_ be accepted - the self and the other as points, connections and continuities. 

 

Hari Om.

 

 

Shree 

 

 _Urge_ to make a _form_ , is a choice. The entire process, if it stems from an ego perspective, from thinking to creating a form, may leave us restless. Form has its own property and it comes from an inner property too. 

 

However if one is beyond any urge, then the _arrival_ to a form may be different. So to make a form is NOT mandatory. What triggers this process requires an observation and a choice.

 

Hari Om.

 

 

श्री 

 

विचारातून जे संबंध आणि साखळी होत राहतात, त्यातून तात्पुरतेपण किंव्हा भीतीला काही करता येऊ शकते का

 

ही भावना विचारातून घालवून टाकू शकतो का, की त्याला काही वेगळीच क्रिया लागू शकते? हा प्रश्न कार्य भावाशी निगडित आहे आणि पूर्णपणे समर्पण भाव प्रज्वलित करण्याशी. 

 

म्हणजे थोडक्यात जी जाणीव किंव्हा जो भाव स्थिरावला जातो, त्यातून संबंधांचे रूप, साखळीची क्रिया आणि एकंदरीत भावना निर्माण होऊ पाहते. 

 

प्रत्येक घटकेचा ज्याचा त्याचा स्वभाव असतो आणि इतर घटकांशी सबंधित असतो. ते स्वीकारावे लागते. अनुभवाचे स्वरूप, कार्य, स्मरण, प्रतिक्रिया, संवाद.... हे पूर्णपणे स्वीकारावे लागते. अर्थात, हा अभ्यास असतो आणि ती जाण काही उपजत असेलच असे सांगता येत नाही. तशी जाणीव शुद्ध करायला लागते आणि तो असतो आपला मार्ग. 

 

त्यासाठी नामस्मरण करावे.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

अस्तित्व जाणीव खूप सारे कार्य दर्शवते आणि त्या बद्दल आपल्याला समजून येते मनोरचने प्रमाणे. अस्तित्व भगवंताचे असते, त्यातून खूप सारे रूप आणि आकार होते, त्यातील एक रूप म्हणजे मनुष्य जीव. रूप होताना त्या प्रमाणे स्मरणही घेतले जाते (त्या रूपाने) म्हणून ते रूप स्वतःच्या स्मरणाला धरून राहते (म्हणजे शुद्ध कार्याचे विस्मरण होते). शुद्ध कार्याची जाणीव जशी प्रबळ होते, तसे मन सूक्ष्म होते, श्रद्धा वाढते, शांती संक्रांत होते, सत्याचा अनुभव येतो, स्थिरपणा येतो वगैरे. 

 

त्याचा छोटा घटक म्हणजे _विचार_. विचाराला देखील अस्तित्व असतं, म्हणून त्याचा परिणाम होतो किंव्हा त्यातून स्मरण प्रज्वलित राहतं. जिवंतपणा तो कशाचा? देहाचा की रूपाचा की विचाराचा की आणखीन काही?!...ह्यातून निर्मिती काय, तात्पुरतेपण काय, वेगळेपण काय, संबंध काय, स्थिर कायकायम काय - ह्या गोष्टी ओळखता येतात कालांतराने. 

 

कार्य करत राहावे. 

 

हरि ओम.