Wednesday, November 19, 2025

श्री

श्री 

प्रश्न माझ्यासाठी कायम असतात, त्याचे स्थान राहते मनात. कदाचित मी शाश्वत आनंदाचा अनुभव आत्मसात करण्याची धडपड करत असीन. कृती, स्थळ, वेळ, लोकं ह्यापेक्षा एखाद्या गोष्टीचा विचार येत राहतात मनात आणि ते प्रश्न देतात. त्या प्रश्नाचे उत्तर हवे की नाही, is as similar as saying that questions ought to have some purpose or form should always follow a function! असे काही जर - तर विधान नसते प्रश्नाचे! किंव्हा मला येऊ पाहणारे प्रश्नाचे स्वरूप तरी तसे वाटतात मला. 

तरीही असे प्रश्न जेव्हा प्रकट करतो मी, तेव्हा इतरांना कदाचित मी वेडा आहे असे वाटत असीन किंव्हा मी काय बडबड करत आहे, असेही वाटत असेल त्यांना. खूप काळ जाऊन असे जाणवायला लागले की प्रश्नांचे समाधानकारक उत्तर कुणाकडेही नसतात. तसे असल्यास, तरीही प्रश्न येणे काहीही थांबत नाही. आणि असे असून सुद्धा शांत राहण्याचा प्रयत्न मला सुरू करणे भाग झाले.....प्रश्नाला उत्तरे देणे कुणालाही बंधनकारक नाही; प्रश्न येऊ न देणे अशी अपेक्षा चुकीची असते; प्रश्न येणे ह्यातून स्वतःला किंव्हा इतरांना लेखू नये; प्रश्न म्हणजे "माहित नाही" किंव्हा "ठामपणा नाही" असे होत नाही; प्रश्नाचे उत्तरे तातडीने किंव्हा एक साच्यात हवे असे काहीही नाही; प्रश्न असे हवेत की त्याचे उत्तरांचे स्वरूप आखता येईल असे नाही...

असे प्रश्न असतील स्वतःला, तर ते कुठल्या रूपात, स्थळात, आकारात सामावू शकतील?!!...

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home