Saturday, November 15, 2025

श्री

 श्री 


संकल्पना आपल्यासाठी कधीही स्थिर नसते. त्यात विचार धारा, भावना, वृत्ती, भाव, _संबंध_, द्वैत, हालचाली, बदल, स्थळ, काळ, पूर्वीच्या घटना, येऊ पाहणाऱ्या गोष्टींचे विचार, आताच्या क्षणातील संबंधित असणारे विचार वगैरे वावरत राहतात. 

म्हणजे असे दिसेल की वरील शक्तीचे कार्य संकल्पना निर्माण करते (imagination). ती इतकी प्रभावशाली असते आणि सूक्ष्मातून आली असते की तिचा उगम समजून येणे कठीण, तिच्यात आपण होतो...म्हणजे संकल्पना आणि "मी" ह्याचा एकजीव संबंध असतो. मी संकल्पना करत नाही...तर मीच देवाची संकल्पना होतो! म्हणून सर्व गोष्टी देवाच्या इच्छेने होत असतात, हे ओळखावे आणि पचनी पाडावे मनाला. 

वरील मार्ग आहे जाणीव शुद्ध होत राहण्याचा, तसा अनुभव होण्याचा. कुणीही जन्म घेतल्या घेतल्या शुद्ध जाणीव घेऊन आलेलं नसते. तसा गूढ प्रश्न निर्माण झाल्यावर योग्य परिवर्तन होऊन, जाणीव भगवत स्वरूप होते. म्हणजे भगवत स्वरूप भाव स्थिरावणे, हे ही अभिप्रेत आहे अनुभवात. तसे जरी असले, तरीही तो मार्ग गूढ असतो, अनाकलनीय असतो आणि रेषे सारखा नसतो. म्हणजेच की मनाने दाखवलेल्या मार्गावर पूर्ण निर्भर न राहता, श्रद्धेवर भर दिला जातो. त्यावरून शक्ती शुद्ध होत भगवंता पर्यंत नेऊन पोहोचवते (परिवर्तन होते). 

हे कार्य योग्य पद्धतीने घडण्यासाठी नामस्मरण करत राहावे, असे संतांचे सांगणे आहे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home