Wednesday, November 26, 2025

श्री

 

श्री 

 

 _विषय_ चे ध्यान करणे आणि ते मागणे, त्याने खूप काही परिणाम होते, जे भाव, साखळी, संबंध, गुंतणे, स्थिती, स्तर, वृत्ती, चक्र - अशा घटकान मधून मिळत राहते. किंबहुना जो पर्यंत वरच्या घटकांचे कार्य असते, तो पर्यंत विषय निर्माण होत राहणार आणि आपले त्यात स्मरण मिसळले जाणार. हे कुठल्याही परिस्थिती, रूप, आकार बद्दल लागू असते. 

 

म्हणून हे कार्य कोण करते, तर ते अस्तित्व शक्ती करते. मी, असा विषय होणे अभिप्रेत आहे. त्याने त्रासून जाऊ नये. भगवंताचे ध्यान केल्यामुळे विषयांचा त्रास होणे कमी होते आणि मन शांत होते. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

No matter how the phenomenon appears, thoughts can be refined to offer peace. 

 

अनुभवात भगवंत असतोच, माझ्यात तो असतोच, म्हणून मी त्याच्यातून होतो आणि सर्व गोष्टी, रूप, आकार संबंधित असतात, ते बिलकुल विघटित नसतात. विघटित वाटणे, हे तात्पुरतेपणाचे लक्षण, वेगळेपणाचा भाव, मनोवृत्तीची स्थिती दर्शवते. करता करवणारा "तो", ती शक्ती असते. 

 

आपल्यात अनेक गुणांचा समावेश आणि संबंध असतो. एक गुण वेचणे, असे होणे अवघड, म्हणून स्वतःला (जो काही _अर्धवटपणा_ वाटत असेल, _भीती_ वाटत असेल, _शंका_ वाटत असेल, कोडी वाटत असतील), संपूर्ण स्वीकार करणे आले. मी कुठल्याही घटकांना दोष देणार नाही, कारण हे सर्व घटक भगवंताने दिले आहेत. त्याचे परिणाम असणार, त्याच्यातून जाणिवेचा मार्ग निघणार, त्याच्यातून भगवंताचा मार्ग गवसणार.

 

म्हणून सर्व जीवनात स्वीकारणे. जीवन आतून आणि बाहेरून असते. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

माझ्यासाठी कदाचित, जे देवाला माहित असावे, की लिखाण त्याच्या पर्यंत आणेल....अंतर्मुख भाव प्रकट करून देईल, शंकेला आत्मसात करेल, शांत करेल, सर्व स्वीकार करण्याची ताकद देईल...journalism would be an important discipline for me perhaps. 

 

लिखाण आणि त्यातून आयुष्याचे रूप गूढ पद्धतीतून संबंधित असावे, सरळ नाही. टीका करण्याचा हेतू नाही, ना दोष काढण्याचा, ना विषय सोडवण्याचा, ना अनावश्यक गुंतून राहण्याचा. मर्यादा काय असते, हे ओळखण्यासाठी कदाचित लिखाण असावे. 

 

स्वतःला मी प्रश्न विचारायचो की अशा लिखाणाचं काय उपयोग जगासाठी? आता वाटते, की हा प्रश्न सोडवण्यासाठी नसावा. अशा लिखाणाचे देखील स्थान असेल. आणि कुठल्याही स्थानेला प्रकट होण्याची मुभा असते आणि अर्थात ती देवाच्या शक्तीतूनच येते. 

 

म्हणजे शेवटी प्रत्येक गोष्टीला दृश्याचे कारण देऊ नये, त्याने उगाचच त्रास होतो. वास्तुकलेचेही तसेच असावे. *प्रत्येक कलेचे कारण दृश्यात दडलेले असतेच किंव्हा पाहिजेच असे काहीही नाही* (not all things of spatial experience belong to a context through a causal relationship). गोष्टीचे कारण असते भगवंताचे कार्य. म्हणून ते कार्य स्वीकारावे आणि शांत व्हावे.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

सर्व गोष्टी "कुणाच्या उपयोगासाठीच" कराव्या, हा अट्टाहास आहे!...ह्यातून आपण स्वतःला खूप परावलंबन करून घेण्याची शक्यता निर्माण होते. हे पचवणे महत्वाचे आहे. करुणामय असावे वगैरे ठीक आहे, पण हा अर्थ गूढ आहे, सरळ नाही. 

 

वरील विचाराचा अर्थ एवढाच आहे की कर्तव्य करावे आणि कशाचीही अपेक्षा ठेवू नये. हे कठोर वाटते, त्रयस्थ झाल्यासारखे वाटते आणि स्वार्थीही वाटते. पण हा अनुभव घ्यायला लागतो, तरच त्याचे मोल कळून येते. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

करत राहणे, कारण त्यातून शांतीचा मार्ग येतो...सरळ रेषे पासून ते चक्र ते त्याच्याही पलीकडे होणे. प्रत्येक टप्प्यात स्मरणाचे स्वरूप बदलेल. आपण हालचाली का करतो, ह्याचे मूळ कुठे असते आणि त्यातून संबंधांचे स्वरूप आपण कसे जाणून घेतो, हे शक्तीचे जागे होणे आहे. 

 

करत राहणे. करता, करता भगवंताचे अस्तित्व जाणिवेत येईल. करण्याचे प्रयोजन त्याच्याशी आणते, म्हणून गोष्टी करावे...त्याला अडवू नये. करून मन स्थिरावते. कारण आपण एखादी गोष्ट फक्त करत नाही. त्यात विचार आणि भावना गुंततात आणि त्या करण्याचे स्वतःवर परिणाम होतात. त्यातून प्रश्न उद्भवतात आणि त्याचा शोध वावरत राहतो. त्या शोधाचा प्रत्यक्ष आकार म्हणजे "गोष्टींचे असणे आणि करणे". 

 

बदल होऊ देणे, प्रारब्ध होऊ देणे, हालचाली घडू देणे, व्यवहार होऊ देणे, दृश्याचे स्थान असू देणे. ह्या सर्व स्थितीतील वावरत राहताना, भगवंताची जाणीव येईल. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

भगवंताचे कार्य स्थित असते. मी पणाने वावरत राहताना, वृत्ती किंव्हा भाव किंव्हा स्मरण किंव्हा रूपाचा संबंध ठेवून इतर द्वैत वस्तू आपल्या ध्यानी येतात आणि त्यामुळे व्यवहार किंव्हा गुंता किंव्हा संबंध होतो. ही मनोरचना आहे आणि त्याचे परिणाम आहेत. एखादे बिंदू आणि जर - तर ह्या भाषेत कितीही जरी सांगितले गेले, तरीही सत्य हेच असते की कार्य भगवंताच्या शक्तीच्या असण्यामुळे होते. अस्तित्वाचा आपल्यावर खूप परिणाम होत असतो. "आपण होणे" ही संकल्पना आहे, जी भगवत इच्छेमुळे प्रकट होते. 

 

प्रारब्ध किंव्हा परिस्थिती कशीही जरी भासली आणि त्यात पूर्वीच्या संकल्पनांचा आणि उद्या होणाऱ्या संकल्पनांचा समावेश घडत असला, तरीही त्यातून स्वतःतील शांती भावाचे स्थान अवलंबून होण्याची *गरज नाही.* म्हणजे दृश्याला स्पष्टीकरण - अशी प्रतिक्रिया प्रकट करण्याची गरज नसते, किंव्हा कारण देण्याची गरज नसते....म्हणजे त्यावरून दृश्याचा अर्थ लावू नये. 

 

दृश्य आहे तसे असू द्यावे. त्यात नामस्मरण करत राहावे. योग्य परिवर्तन होण्याचा अनुभव संक्रांत होत जाईल.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

अस्तित्व आणि त्याच्या कार्याची जाणीव, ही कालांतराने समज संक्रांत होते मनात. मनुष्य असा जीव आहे, की स्वतःला एक स्थितीची जाणीव असते त्याला, म्हणून विचार आणि भावनांचा एक व्यवहार सत्य ओळखण्यात, पचवण्यात, आत्मसात होण्यात तो वापरू इच्छितो. परिणाम स्वतःच्या कृतीचा, ही जाणीव असते त्याला दिलेली, म्हणून शक्तीचे कार्य हे *दुहेरी* असते, म्हणजे आत आणि बाहेर असा संबंध असतो, हे तो ओळखून असतो. म्हणून शांत होण्याचा प्रवास तो घेतो. 

 

शक्तीला दोन अंग असतात. Two sides of the same coin. अंतर्मुख भाव, ही एक बाजू आहे आणि त्याचा संबंध किंव्हा रूपांतर बहिर्मुख भावात होऊ पाहणे आणि तो भाव जाणवत राहणे, हा दुसरा अंग. ह्या दोन्ही बाजू "मन" जोडते किंव्हा मनात दोन्ही बाजूंचे समावेश असते, म्हणून प्रश्न, तात्पुरतेपण, जाणीव, मार्ग, स्वीकार अश्या गोष्टी ध्यानात येऊ पाहतात. 

 

दृश्य भाव चुकीचे असते, असे अध्यात्म म्हणत नाही. फक्त अंतर्मुख भाव पाहिजे असे ही ते नमूद करेलच असे काही नाही. हा जर आणि तर चा विषयही नाही. ही फक्त शक्ती जाणून घेण्याची गोष्ट आहे. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

लोकं वृत्तीला, तिच्या अर्थला खूप गुंतून राहतात....त्यात मी ही आलो. जेवढी चिकित्सा करू, तितकेच आत जायला लागते, तितकीच दृढ भावना होते, तितकीच अधिक चर्चा होते, तितकेच विषय मिळतात, तितकेच प्रश्न येतात, तितकेच विचार आणि भावना चक्र निर्माण होत राहतात...

 

ह्याला एका पद्धतीने बडबड करत राहणे, बोल बच्चन करणे, सतत विषयाचा चावा घेणे, स्वतःचे सांत्वन करणे असे संबोधित होते. हे नाही थांबत!...असे का असते स्थित, हे भगवंतावर सोडणे. जी त्याची इच्छा, तसे होत राहील. 

 

ह्यातून किंव्हा वरील व्यवहारातून अर्थ काय काढावा, हे ही कधी कधी निरर्थक वाटते...म्हणजे अर्थ शोधण्याचा अट्टाहास स्वतःला गोत्यात आणू शकतो! म्हणून शांती भाव आत्मसात होऊ पाहणे आले.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

कार्याचे निश्चित स्थान असते. त्याच एकंदरीत सर्वांगीण आणि सर्व स्तराच्या भाषेतून, _कार्य_ , ही संकल्पना आत्मसात करावी लागते. 

 

कार्य, हे अस्तित्व आहे आणि त्यात ७ स्तर आणि २ अंगे स्थित असतात. त्यांचा संबंध असतो एकमेकांशी आणि त्या संबंधातून मी होतो, परिस्थिती होते, अनुभव होतात आणि त्याचा प्रवाह असतो. 

 

आपल्या जीवनात दोन गोष्टी नमूद केल्या आहेत मन स्थिर व्हायला. पहिली म्हणजे कुठलीही कृती कार्य आहे, असे समजून करावे (म्हणजे हेतूच्या पलीकडे करावे). दुसरी म्हणजे नामस्मरण करावे (भगवंताच्या शक्तीचे अस्तित्व ओळखावे). 

 

वरील दोन पद्धतीतून मार्ग अनुभवात संक्रांत होतो आणि शेवटी मन स्थिरावते. हे अत्यंत गरजेचे आहे जीवासाठी. त्यासाठी मनात तशी भावना सज्ज व्हायला हवी. म्हणजे शेवटी गरजेवर सगळे असते. _भगवंत पाहिजेच_, अशी गरज निर्माण झाली, की मार्ग स्पष्ट होतो. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

आपली जाणीव ज्या स्थितीत असते, तिथून स्थिरतेच्या मार्गाला _सुरुवात_ करावी. मागे काय झाले होते त्याची चिकित्सा करणे किंव्हा आणखीन वेगळे बारकावे शोधण्यात वेळ घालवत बसणे, हे अभिप्रेत नाही. म्हणजे थोडक्यात आपण तात्पुरते किंव्हा अर्धवट आहोत, त्याचे कारण दृश्यात शोधण्याचा खूप अट्टाहास धरू नये किंव्हा तसा त्याला विषय सारखे बघू नये. "बघू नये" म्हणजे ह्याचे उत्तर पूर्णपणे बुद्धीच्या भाषेशी निगडित नसते. 

 

म्हणून गुढपणाचा नियम ओळखून श्रद्धा वाढवणे आणि अंतर्मुख होण्याचा प्रवास पत्करणे. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

प्रश्नाचा एक स्वभाव असतो, ज्याचे उत्तर शोधण्यासाठी तो प्रवृत्त करतो आणि त्यातून प्रश्नांची साखळी लागते. 

 

प्रश्न सोडवावे का? ते मनस्थितीवर आधारित असते. प्रश्नांमुळे उतावळे होणे आणि प्रश्न असून राहू द्यावे आणि शांत व्हावे - ह्या दोन्ही क्रिया घडू शकतात. 

 

आपण जितके सूक्ष्म होऊ, तरीही प्रश्नांचे रूप असते ध्यानात आणि त्यातून शोध क्रिया, जाणून घेण्याची क्रिया चालू असते.  

 

प्रश्न सिद्ध होण्यासाठी नसावे आणि त्यातून स्पष्टता मांडण्यासाठीही नाही. सत्याचा प्रवास स्वतःसाठीचा असतो, इतरांना सांगण्यासाठीचा नसावा. प्रश्न होण्यासाठी कारण पाहिजेच असे नाही.

 

Nowadays converting everything into a _problem_ seems to be "in"! Because only then, the prospect of finding a solution materializes it seems! Our identity is hinged on a problem statement seems to be a current belief. 

 

It is however, not a new tendency, maybe more intense nowadays. अध्यात्म मध्ये ह्याला "विषय" संबोधित केले आहे. काहीतरी करत बसणे आणि स्वस्थ न होऊ पाहणे, हा मनाचा स्वभाव दिसतोय. त्या स्वभावाला *शांत* करणे, ही आध्यात्मिक जाणीव आहे. 

 

आपण आणि अनुभव स्थित असतात...त्याला कारण असे काही नसते किंव्हा ते भगवत इच्छेवर ठरते. म्हणून उगाचच कष्टी न होणे, जास्ती चिंता किंवा चिकित्सा न करावे. काल चक्र त्याचे त्याचे कार्य करत राहते, आपण फक्त त्यात हातभार देतो. 

 

शांत रहावे आणि कार्य करत राहावे.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

सर्वांगीण परिवर्तन होणे, हे अध्यात्म भावाचे ध्येय आहे. ह्याचा अर्थ की सर्व घटकेत, सर्व स्तरात, सर्व संबंधात, सर्व ठिकाणी परिवर्तन होणे. बुद्धीच्या दृष्टीने बघितले, तर ह्याला काही मर्यादा नाही. बुद्धी पाहिले वेगळे वेगळे घटक बघेल तिच्या स्वभावा प्रमाणे. मग त्यात संतुलन आणण्याचा प्रयत्न करेल (idea of balance so one thing doesn't become extreme or out of control). तसे करत राहता राहता कधीतरी तिला प्रवाहाची जाण येईल, की गोष्टी मिश्रीतच असतात आणि एकातुनेक प्रकट होत राहतात...मग शोध मूळ गोष्टी सापडण्याचा होतो. मग जाणून येते की हा शोध श्रद्धेने आणि कृपा असल्याशिवाय होणे अशक्य. तिथे भक्तीचे उगम होते. आणि अंतर्मुख होता होता, मन सूक्ष्म होते आणि स्थिरावते. 

 

ह्या वरील प्रवासात नामस्मरणाचे महत्वाचे स्थान असते. त्याचे कारण असे की श्रद्धा भाव आणि अंतर्मुख होण्याच्या क्रियेला हातभार लागतो ते करत राहिल्याने. आणि सर्वांगीण परिवर्तन होऊ पाहते. 

 

बर....त्यातून व्यवहारात काहीतरी उपयोग होतो का किंव्हा काहीतरी त्याचा वापर करू शकतो का?...असे प्रश्न श्रद्धा वाढवणे कठीण, कारण ह्या प्रश्नांनी आपण श्रद्धा भाव "विषयात" मांडू इच्छितो! श्रद्धा म्हणजे विषय शांत होणे, स्वतःच्या रूपाला शांत होऊ देणे, विलीन होणे, किंव्हा त्याच्या पलीकडे जाणे किंव्हा बुद्धी स्थितील होणे, किंव्हा सत्य ओळखणे जे स्वतःच्या आतच स्थित असते. ते आपल्या बुद्धीच्या हातात थोडीच आहे?!...म्हणून तिथे प्रार्थना करणे गरजेचे होते आणि कृपेचे पात्र व्हायला लागते. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

प्रश्न आणि संबंध आणि प्रवास हा प्रत्येकाचा ग्राह्य धरला जावा. Accept the situation "as it is". सर्व गोष्टी स्थित आहेत...ते असणार. म्हणजे मग व्याकुळता, परिणाम, शोधाचा मार्ग प्रत्येकाचा वेगळा असणार. हे ही बरोबरच आहे. म्हणजे प्रत्येकाला सत्याचा अर्थ मांडण्याची मुभा देणे, वेळ देणे, मान्य करावे, स्वीकारावे, संबंध त्या प्रमाणे जोडावे. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

मानवी जीवनात _अनुभव_ हा अनुभव येऊ इच्छितो ही महत्वाची बाब असली हवी. त्याला वेगवेगळे नावे देखील आहेत, जसे की मी, वृत्ती, वासना, चक्र, साखळी, स्वभाव, स्मरण, भाव, दृश्य, स्थिती, स्तर, संबंध, मन, रूप, आकार, क्रिया, हेतू, तात्पुरतेपण, वेगळेपण, गुंतणे , विषय, कोडी, प्रवाह, प्रवास, प्रारब्ध, भोग, परिणाम वगैरे. 

 

वरील शक्तीचे कार्य समजावे. ते कार्य असणारच आणि त्यातून जीव होणारच. तसे असल्यामुळे मार्गाची भूमिका त्यातूनच निर्माण करू द्यावी लागते. आणि त्यातूनच "भगवंत" ही संकल्पना आपल्यासाठी संक्रांत होते. 

 

हे प्रयोजन भगवंताकडून दिले गेले आहे जीवासाठी, म्हणून तसा अनुभव होतो आणि प्रश्न पडतात आणि शोध प्रज्वलित राहते. त्या शोधात बेचैनी, त्रास असे घटक असतात. ते भावना येऊ देऊ नये किंव्हा त्याला प्रतिक्रिया देत रहाणे - ही अपेक्षा चुकीची ठरते. येणे आणि जाणे हे आपल्या हातात नसते म्हणून स्वीकार होण्याची आणि कार्य करण्याची भूमिका धरायला लागते. आयुष्यात ह्या दोनच गोष्टी आपण करू शकतो शंका न घेता - स्वीकार आणि कार्य. त्याचा परिणाम योग्यच होत असेल. 

 

हरि ओम.

 

0 Comments:

Post a Comment

<< Home