Friday, November 14, 2025

श्री

श्री 

शुद्ध होण्याला पर्याय नाही. पर्याय नाही, ह्याचा अर्थ की श्रद्धेने सर्व आत्मसात करावे आणि आत परिवर्तन होऊ पाहणे, अंतर्मुख होणे, वृत्ती विलीन करावे वगैरे. 

वृत्तीचे स्थान भगवत इच्छेने असते, म्हणून त्याचे संस्कार मनात राहणार आणि ती इतर सर्व संबंध प्रज्वलित ठेवणार. मी जरी आकाराला महत्वाचे मानत नसलो, तरी साखळीत, क्रियेत, भावनेत, रुपात गुंतत राहतो आणि फोड करण्याचा प्रयत्न करतो...कदाचित भीती पोटी. साखळी म्हणजे काय, ते कसे होते, काय करते, कसे बदलत राहते हे प्रश्न मनातील. साखळीचे प्रवाह राहतात, म्हणून ते ताब्यात येत नाही आणि तशी अपेक्षाही ठेवणे वेडेपणाचे असावे. साखळीच्या प्रवाहात राहणे, हे देखील भगवंताचे कार्य आहे. आपण व्हावे, वावरावे, हालचाली जाणून घेणे आणि विलीन होणे अशी *इच्छा* आहे त्या शक्तीची, त्या प्रमाणे प्रयोजन होईल.

निर्णयाची घाई करणे अभिप्रेत नाही आणि सर्व ठेका आपण उचलावा, असा ही त्याचा अर्थ होत नाही. मुळात आतील क्रियांचे वावर आणि बाहेरील त्याचे परिवर्तन, ह्याच्या चिकित्सेत गुंतून राहू नये. चक्र कसे असते, ह्याचीही चिंता करू नये. चक्र स्थित असते. ते होणार. ते अस्तित्वाचे स्थित कार्य आहे. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home