श्री
श्री
स्वतःचे रहस्य _गूढ_ आहे आणि ते अनेक गोष्टीतून "प्रकट" होत
असते - जसे की स्थिती, स्तर, संबंध,
भाव, वृत्ती, विचार आणि भावना
चक्र, अनुभव, परिणाम आणि त्यामुळे
होऊ पाहणारे स्मरण. इथे "मी" कुठे आहे, असे जर विचारले,
तर हाथी काही लागणार नाही! म्हणजे गोष्ट किंव्हा रूप किंव्हा आकार ही संकल्पना
असते (a construct), प्रत्यक्ष तिला तसा _स्वतंत्र_
अस्तित्व नाही! ह्याचाच अर्थ की _क्रियेतून_,
प्रवाहातून, संबंधातून ती "गोष्ट" ध्यानात अवतरते
किंव्हा प्रकट होते आणि बदलत राहते! म्हणजे क्रिया होत राहणे (ज्याला कार्य
संबोधले आहे) ते स्थित असते अस्तित्वात. अस्तित्व म्हणजे कार्य.
स्वतःची गोष्ट इथं पर्यंत मर्यादित राहत नाही अर्थातच. त्या प्रक्रियेत
अनुभवाचे स्वरूप किंव्हा स्मरणाचे रूप जे होते, त्याला _द्वैत_
म्हणतात. त्या अनुभवात अनेक रूपे आणि आकार येत राहतात आणि निघून जातात आणि त्यात
आपण गुंतून राहतो. ह्याचा असाही अर्थ होतो की गुंतणे देखील खूप गूढ क्रिया आहे
जिचा उगम सूक्ष्मातून होतो म्हणून तो ध्यानी यायला वेळ लागतो आणि तो सारे रूपाच्या
पलीकडे उगम पावतो. शिवाय गुंतून राहणे म्हणजे स्मरणाचे रूप. स्मरण मर्यादित असले
(रूपावर आणि आकारावर निगडित) तर गुंतून रहाण्याचे रूप घट्ट होते;
स्मरण जर प्रवाहाचे असले किंव्हा सूक्ष्माचे झाले,
तर गुंतणे क्रिया विलीन होते.
आता ह्या वरील कार्याला मी विषय म्हणून बघू शकतो,
ज्यामुळे व्याकुळता, बेचैनी, अट्टाहास,
अपेक्षा असे भावना प्रकट होऊ पाहतात....
किंव्हा मी वरील कार्याला शांतीने स्वीकारण्याचा निर्णय घेऊ शकतो,
ज्यामुळे समाधान भाव कधीतरी लाभू शकते.
वरील कार्य होतच राहते, हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे. ते स्थित असतेच आणि
त्या प्रवाहात _एखादे_ रूप म्हणजे आपण होऊ पाहतो,
बदलत राहतो आणि निघूनही जातो.
हरि ओम.
Shree
Process and messiness of arriving at a synthesized form
is integral in our learning experience. This happens because of vibrations,
memory, our own tendencies and connections. To skip messiness and state a final
product is ridiculous and i feel, impossible and non digestible.
Therefore in life, all situations, which come to be
experienced, are crucial to _lead_ to a synthesis. So accept all that
there is.
Secondly, messiness and that getting streamlined takes
its own time. That is the Ordering principle. And how should that get
streamlined or synthesized is each one's _language_ of being aware. So by
default, that should _also_ be accepted - the self and the other as points,
connections and continuities.
Hari Om.
Shree
_Urge_ to make a _form_ , is a choice. The entire
process, if it stems from an ego perspective, from thinking to creating a form,
may leave us restless. Form has its own property and it comes from an inner
property too.
However if one is beyond any urge, then the _arrival_ to
a form may be different. So to make a form is NOT mandatory. What triggers this
process requires an observation and a choice.
Hari Om.
श्री
विचारातून जे संबंध आणि साखळी होत राहतात, त्यातून तात्पुरतेपण
किंव्हा भीतीला काही करता येऊ शकते का?
ही भावना विचारातून घालवून टाकू शकतो का, की त्याला काही
वेगळीच क्रिया लागू शकते? हा प्रश्न कार्य भावाशी निगडित आहे आणि पूर्णपणे
समर्पण भाव प्रज्वलित करण्याशी.
म्हणजे थोडक्यात जी जाणीव किंव्हा जो भाव स्थिरावला जातो,
त्यातून संबंधांचे रूप, साखळीची क्रिया आणि एकंदरीत भावना निर्माण होऊ पाहते.
प्रत्येक घटकेचा ज्याचा त्याचा स्वभाव असतो आणि इतर घटकांशी सबंधित असतो. ते
स्वीकारावे लागते. अनुभवाचे स्वरूप, कार्य,
स्मरण, प्रतिक्रिया, संवाद.... हे
पूर्णपणे स्वीकारावे लागते. अर्थात, हा अभ्यास असतो आणि
ती जाण काही उपजत असेलच असे सांगता येत नाही. तशी जाणीव शुद्ध करायला लागते आणि तो
असतो आपला मार्ग.
त्यासाठी नामस्मरण करावे.
हरि ओम.
श्री
अस्तित्व जाणीव खूप सारे कार्य दर्शवते आणि त्या बद्दल आपल्याला समजून येते
मनोरचने प्रमाणे. अस्तित्व भगवंताचे असते, त्यातून खूप सारे
रूप आणि आकार होते, त्यातील एक रूप म्हणजे मनुष्य जीव. रूप होताना त्या
प्रमाणे स्मरणही घेतले जाते (त्या रूपाने) म्हणून ते रूप स्वतःच्या स्मरणाला धरून
राहते (म्हणजे शुद्ध कार्याचे विस्मरण होते). शुद्ध कार्याची जाणीव जशी प्रबळ होते,
तसे मन सूक्ष्म होते, श्रद्धा वाढते, शांती संक्रांत होते,
सत्याचा अनुभव येतो, स्थिरपणा येतो वगैरे.
त्याचा छोटा घटक म्हणजे _विचार_.
विचाराला देखील अस्तित्व असतं, म्हणून त्याचा परिणाम
होतो किंव्हा त्यातून स्मरण प्रज्वलित राहतं. जिवंतपणा तो कशाचा?
देहाचा की रूपाचा की विचाराचा की आणखीन काही?!...ह्यातून निर्मिती
काय, तात्पुरतेपण काय, वेगळेपण काय,
संबंध काय, स्थिर काय, कायम काय - ह्या
गोष्टी ओळखता येतात कालांतराने.
कार्य करत राहावे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home