श्री
श्री
शक्तीचे *कार्य* असते अस्तित्वात. त्याला आपण जाणीवही म्हणू. आणि ते भाव, स्मरण, साखळी, स्तर, संबंध, अर्थ, चक्र, संकल्पना, रूप, आकार, परिणाम ह्याच्यातून कार्य करत राहते.
कार्य कसे होते, हे खूप गूढ प्रकरण आहे आणि ते भगवत इच्छेतूनच प्रकट होत असते. माझ्या म्हणण्यावर काहीही होत नाही. माझ्या इच्छेवर काहीही होत नाही. माझ्या सांगण्यावर काहीही होत नसते. म्हणजे जर - तर ह्या भूमिकेवर मर्यादित परिणाम होत असतो.
म्हणून जर - तर च्या भाषेत न गुंतून राहता, शुद्धतेकडे वाटचाल धरावी.
रूप आणि आकार कसे असतात (स्वतःचे आणि इतरांचे) ह्यावरून फक्त बाहेरील चित्रण दिसते आणि कदाचित त्याला बहिर्मुखपणा म्हणत असावे. अंतर्मुख होताना रूप आणि आकाराची भाषा किंव्हा वावर विलीन करायला लागते. म्हणजे डब्बा उघडून आत फक्त आकाश आहे, असे व्हायला लागते. त्यासाठी स्वतःला तशी परवानगी द्यायला लागते व्हायला.
तो जो काय मी आहे, तो डब्बा नाही, आकाश आहे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home