श्री
श्री
सर्व सगळ्यांना सांगणे आणि परिवर्तन होणे सर्व ठिकाणी, अशी अपेक्षा असावी माझी. नाही सांगितले तर विचारांचे संबंध स्पष्ट होत नाही, असे वाटते. एका अर्थ असे वाटणे योग्य आहे आणि दुसऱ्या अर्थाने पूर्ण होण्याची धडपड असावी. कुठल्याही कृतीत खूप साऱ्या विचार आणि भावना चक्र *कार्य* करत राहतात, एक दुसऱ्यांवर संबंधित होतात, बदल पावतात, चढ उतार दर्शवतात, हालचाली दर्शवतात....त्यामुळे भावात अंतर्मुख जाणीव असते आणि बहिर्मुख जाणीवही. त्यातून ओढाताण होते.
ओढाताण ह्यातून शांती भाव संक्रांत होण्यासाठी पूर्णपणे अंतर्मुख भावनेत विलीन होणे अभिप्रेत असते. अंतर्मुख ते बहिर्मुख भावाचे *संबंध* भगवत निर्मित असतात, आपल्या दृष्टीने गूढ जाणवतात.
म्हणून भगवत स्वरूप व्हायला प्रयत्न, श्रद्धा आणि कृपेची जोड करायला/ व्हायला लागते आणि हे एकाच वेळेला कार्य करत राहतात.
हरि ओम.
श्री
शंका आणि मी ह्याचे नाते आहे. ते खूप आतून आले असावे आणि त्यातून माझे विचार चक्र आणि भावना चक्र कार्य करतात. शंकेला घाबरून चालणार नाही, ते आत्मसात व्हायला हवे. ह्याचाच अर्थ असा की भगवंतावर श्रद्धा वाढवणे आणि त्यातून एक घटक शंकेचा असतो हे ओळखणे.
शंका म्हणजे भगवंताला विसरणे असे होत नाही, सिद्ध होणे असेही होत नाही, किंव्हा भगवंताचे आणि शंकेचे नाते काय असते असा शोध ही नाही. भगवंतच आहे आणि कार्यामुळे शंकाचे स्थान होते, हे स्वीकार करणे.
स्वतःपासून म्हणून सुरुवात करायला लागते. शंका हे धाग्याचे एक टोक म्हणून, ते काय काय दर्शन घडवते हे बघावे आणि कुणास ठाऊक...ते भगवंताकडे ही पोहोचवेल!
शंकेमुळे (वृत्तीचा एक रंग) त्यामुळे "दर्शन" असा प्रवाह होत राहतो. प्रवाह हे कार्य आहे. ते बघत स्थिर व्हावे. संपूर्ण सूक्ष्मापासून ते स्थूलपर्यंत सर्व क्रिया भगवंताशी निगडित आहेत, हे ध्यानात येऊ देणे . सर्व त्याचेच आहे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home