श्री
श्री
अस्तित्वाचा स्वभाव असतो, ज्याला जाणीव आहे. शांत भाव असला, तर सर्व माध्यमाच्या पलीकडे अस्तित्व स्थित असते. त्याच्या व्यतिरिक्त बाकी सर्व प्रकाराचे भाव निर्मितीला प्रज्वलित ठेवतात आणि रूप आणि आकार आणि संबंध प्रकट करत राहतात. त्यातून स्मरण होते.
स्मरणात सूक्ष्म ते स्थूल ते सूक्ष्म स्थिती असते, प्रवाह असतो, परावलंबन असते आणि क्रिया असते आणि परिणाम होतो. हे _कार्य_ कायम स्थित असते, म्हणून अस्तित्वाला स्थळ नाही, काळ नाही, अंतर नाही, गती नाही, हालचाली नाही, परावलंबन नाही, हेतू नाही, स्मरण नाही. "नाही" म्हणजे दृश्यांची उपाधी त्याला लागत नसते.
शांत झाल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. बुद्धीची भाषा प्रकृतीतून येते, म्हणून ते चक्रासारखे वावरते आणि त्याच्यातून परिणाम प्रकट होतात आणि ते गुंतून ठेवतात त्या भाषेत, विषयात, कोडी मध्ये. कितीही बुद्धीची शक्ती वापरली, तरीही त्यातून समाधान मिळणे कठीण, सत्य ओळखणे कठीण.
भाषेची _सवय_ होते, त्याचा आधार वाटू शकतो आणि त्यात आपण कायम गुंतून राहतो. त्याचे मूळ वृत्तीत दडलेले असते, म्हणून वृत्ती कुठे गुंतवून ठेवते, हे ओळखावे.
काय ऐकतो, काय खातो, काय विचार करतो, ह्या सर्वांची सवय होते आणि त्याचे संस्कार मनात घट्ट होतात, तसे स्मरण होते. देह ही वस्तू जरी वाटली, तरी तो भावही आहे, क्रियाही आहे, संस्कारही आहे, परिणामही आहे, संबंध ही आहे. म्हणून सर्व भगवंताकडून येते असा भाव वाढवणे हिताचे ठरते, म्हणजे रूपाचे परिणाम सोसायला लागत नाही.
हरि ओम.
श्री
परिस्थितीत समाधान भाव वाटणे, म्हणजे भगवंताची कृपा आपल्यावर झाली, भगवंताचे संस्कार मनात संक्रांत झाले.
जे होणार असते, ते प्रकृतीतून येतच राहते. तीच कार्याची व्याख्या आहे. त्यात भाव होणे, संबंध होणे, अनुभव होणे, हे ओघाने आलेच. अनुभवाचे खूप स्तर असतात, जे सर्व गूढ संबंधातून एकमेकांना जोडले गेले असतात आणि त्यातूनच _स्मरण_ होते.
हे भगवंताने त्याच्या शक्तित योजिले आहे, म्हणून तसे होणार. हे असणारच आहे, आपल्यासाठी. ते टाळून चालणार नाही. तात्पुरतेपण असणारच आहे, त्याने घाबरू नये आणि विषय मागू नये. आपण फक्त कर्तव्य करावे आणि शांत असावे.
It is not a matter of proof.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home