Saturday, November 15, 2025

श्री

 श्री 


गुंतणे ही क्रिया गूढ असते आणि ती खूप साऱ्या शक्तीच्या कार्यातून प्रकट होते, भाव करते, संबंध जोडते, परिणाम आणते, विचार आणि भावना चक्र प्रकट करते, स्मरण देते, अनुभव देते, मन देते, द्वैत देते, परिस्थिती देते, प्रतिक्रिया देते. एकंदरीत, हे शक्तीचे कार्य म्हणावे, की जन्माचे लागे बांधे का होत राहतात आणि ते आपल्याला परत, परत त्या चक्रात का सामील करतात. मग मागील गोष्टीत का मन संबंधित राहते आणि पुढच्या होऊ पाहणाऱ्या गोष्टींची _संकल्पना_ निर्माण करून का काळजीत राहते? तसे पाहिले तर सर्व गोष्टी संकल्पनाच आहेत...ते खोट्या असून सुद्धा त्यात गुंतायला का होते मनाला?  रूप आणि आकारात मन का गुंतते? रूप आणि आकार देखील संकल्पनाच आहेत!!...

त्या प्रकृतीच्या कार्यात वावरताना, कधीतरी असा प्रश्न निर्माण होतो की "विषय" सोडवण्याचा अट्टाहास का धरावा किंव्हा असावा? सत्य न ओळखून सतत केले गेलेले कार्य स्वतःला कष्टी बनवते आणि सुख दुःख देते. ह्याला काही अंत नाही. असे जेव्हा दिसते, तेव्हा मार्ग शोधला जातो. आणि तो मार्ग म्हणजे शांती भाव आत्मसात करणे. म्हणजे दृश्यात न गुंतणे आणि सर्व प्रकार सोडून देणे. म्हणजे शांत होणे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home