Wednesday, November 19, 2025

श्री

श्री 

माझ्या मनात विचार चालत असतात. ती धारा थांबवता येत नाही, ती काहीतरी करायला लावते आणि ती मन इकडे आणि तिकडे संकल्पनेत किंव्हा संबंधात आणखीन विचार निर्माण करते...त्यातून संबंध, परिस्थिती, परिणाम, स्मरण वगैरे. मुख्यतः अर्धवट असण्याचा भाव प्रज्वलित ठेवते म्हणून अपुरेपण जाणवून देते. म्हणून काहीतरी सतत करण्याची _इच्छा_ राहते. 

A vacuum (difference) of sorts can get created just by being stationed or by listening to someone, compelling me to take action. That need *not* be the case.  ह्यालाच शक्ती उगाचच खर्च करत राहणे विचारातून असे म्हणतात. आपण दमतो. तसे होण्याची गरज नाही. 

माझ्या विचारांच्या पद्धतीमुळे मला शांत बसायला भाग पडते...अगोदरच खूप विचारातून अनेक कंगोरे निदर्शनाला येऊन, प्रतिक्रिया न देण्याची गरज भासते. म्हणून गप्प बसायला होते. त्यातून काही बोललो तर उगाचच वायफळ निरर्थक बडबडीला आपण आमंत्रण देऊ, ज्यामुळे आपली शक्ती वाया जाऊ शकेल असे वाटते. नाही बोललो तर इतरांना आपण आगाऊ आहोत किंवा हेकेखोर आहोत असे वाटू शकते, म्हणून परत संपर्क साधू असे वाटते. 

मला माहित नाही की ही ओढाताण कुठून येते आणि का दिली आहे मला. त्यातून मी असा कसा झालो आणि काय आत्मसात करत आहे. त्यातून इतरांना मी खूप शांत वाटतो, पण ह्या ओढाताणचे वादळ मी मांडू शकत नाही कुणाला. 

ती ओढाताण मला शांत होऊ द्यायची आहे. की मी विचार केला, मांडला, ऐकला, बघितला...तरीही त्यातून काहीही ठरत नसते, काहीही तात्पुरते वाटून घेण्याची गरज नसते, वेळ वाया जात आहे असेही वाटून घेण्याची गरज नसते आणि गप्प किंव्हा शांत राहण्याचा पूर्ण अधिकार मला आहे आणि त्याचे स्पष्टीकरण देण्याचीही आवश्यकता वाटता कामा नये...

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home