श्री
श्री
अस्तित्वात (दृश्यात) आलो असल्यामुळे त्या स्तराचा स्वभाव किंव्हा परिणाम होत राहतो. निर्गुण आणि सगुणाच्या संबंधातून दृश्याचे अनुभव मनात येऊ पाहतात आणि त्या अनुभवाचे स्मरण होते. हे होणे भगवत इच्छा मानावी किंवा स्वीकारावी आणि त्याची _चिंता_ करू नये.
सर्व विचार आणि भावना प्रकृतीचा परिणाम आहे. अध्यात्म ह्याला "खेळ", अशी उपमा देते कारण विस्मरण का होते, हे ठाऊक नाही. स्मरण किंव्हा विस्मरण सोडविण्याचे कोडे बुद्धीच्या _पलीकडे_ असते, म्हणून श्रद्धेचे स्थान असते आणि कृपेची गरज असते. जो पर्यंत हे होण्याला आपला भाव "खेळेसारखा" होत नाही, तो पर्यंत ह्या खेळाचा परिणाम आपण व्ययक्तिक करतो आणि कष्टी होतो.
आपले विचार आणि भावना देवाकडून अवतरतात, म्हणून मूळ कार्य त्याचेच. अध्यात्म जाणिवेचा परिणाम कसा करावा, कसा होईल, कधी होईल, कुठल्या रूपात होईल, हे प्रश्न काही महत्वाचे नाहीत, कारण परिवर्तन योग्यच होईल. जाणीव शुद्ध झाली की योग्यच परिणाम होतो. इथे परिणाम शब्द व्यापक आहे, स्वतःशी निगडित नाही.
म्हणून सर्व चक्राचा परिणाम बाजूला करावा, सूक्ष्म व्हावे आणि शांत व्हावे.
हरि ओम.
श्री
वेग असल्यामुळे त्याचे स्मरण असते, त्याचा परिणाम असतो आणि आकारात अवतरण्याची क्रिया असते.
मूळ अस्तित्व शक्तीचे परिणाम आहेत. त्यातून स्मरणेच्या प्रकारामुळे किंव्हा क्रियेमुळे आकार होत राहतात. आकार होणे, हे होणार...तशी भगवत इच्छा आहे, म्हणून ते होऊ द्यावे, अडवू नये, शंका घेऊ नये. सर्व आकाराचे बीज सर्वांना एकच असते, म्हणून सर्व आकार संबंधित असतात. संबंध शांतीने होऊ द्यावे, हेतू ठेवून नाही.
शक्ती अवतरून आकार होऊ पाहणे, ते बदलत राहणे, ते विरघळून जाणे, हे त्याचे कार्य ओळखावे. म्हणजे त्याला काही "कारण" लागत नाही, की असे का स्थित असते. मनुष्य जीव कारण शोधतो, म्हणून त्रास होतो. जेव्हा कारणेची जागा श्रद्धा घेते, तेव्हा शांतीने घडामोडी स्वीकारल्या जातात.
श्रद्धा वाढवणे आपल्यासाठी योग्य आहे. तसा अभ्यास करावा.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home