Wednesday, October 18, 2023

श्री

 

श्री

श्री, असे काही दिवस असतात कि जेव्हा शांत वाटत आणि तुझ्या बद्दल लिहिण्याची आणखीन इच्छा होते – त्यातला हा दिवस.

तु सूक्ष्म आहेस. आणि सूक्ष्माचा प्रत्येय ते होण्या माध्येच येतो. दृश्य जग स्थूल आहे, आकार घेऊन आहे आणि त्यात माझी बुद्धी आणि भावना कार्य करतात. त्यात त्यांना वेगळेपणा जाणवत आणि त्याच प्रमाणे विचार उद्भवतात, निर्माण करतात, कर्तेपणा ओढून घेतात, बिंदू शोधत राहतात, आकारंना सत्य मानतात, अस्थिर राहतात, आणि परावलंबित होतात आणि दोष शोधत राहतात स्वतः मध्ये आणि दुसऱ्यान मध्ये. थोडक्यात अस्तित्वाच्या एका स्थितीला निर्माण करत राहतात. त्यातूनच त्रासिक होणे, दुख होणे ह्या भावना निर्माण होतात, कारण आम्ही लोक (जीव) “तसे विचार करतो”.

म्हणजे कि विचारांची शैली बदलली कि शांत वाटू शकत. हा उपक्रम योग्य बदल स्वतः मध्ये घडवून आणण्यात आहेच, पण सत्य काय आहे ते जाणणे देखील आहे. सत्य कळलं, कि विचाराचा साचा बदलला. आत्ताच्या क्षणी आपण शांत नाही आहोत आणि ते का हे हि कळायला हव. ते कळणे म्हणजे भगवंताच सर्वांगाने चिंतन करत राहणे. अनुसंधान साधल कि आपण खोल जाऊन, सूक्ष्म होतो आणि शांती लाभते.

दुसरी गोष्ट अशी कि आपल्याला कुठली टेकडी किवा धावण्याची शर्यत जिंकायची नाही आहे. तसं वाटत राहणे म्हणजे आपलं कुठेतरी चुकत आहे समजुती मध्ये. सगळ्या गोष्टींना चालना देणारी शक्ति श्री आहे, दृश्य नाही. वार्या बरोबर पंख्यावर “धूळ” साठली कि दृश्याचा परिणाम दिसतो – पण ते खरं नाही – वारा खरा आहे. पाणी जर दगडावर घासल कि शेवाळ्याच थर साठतो – तर शेवाळ्याच बीज पाण्यातच होत का? म्हणजे कुठल्याही गोष्टीच बीज, निर्माण होण्याची क्रिया, गुण आकारास येण्याची क्रिया त्या सूक्ष्म शक्तीतच असते – जि इतकी सूक्ष्म आहे कि आपल्याला कळत नाही – पण तिचं असणे निश्चित असते. म्हणजे गोष्टींच मूळ  - उद्भवणे, बदलणे आणि मावळणे ते अनंत असलेल्या शक्ति मुळे होत – माझ्या मुळे नाही. राग येण्याच काय कारण?! कसला तो अभिमान?!

काही करून दाखवायचं नाही आहे कुणाला आणि सिद्ध होण्याचीही गरज नाही. गोष्टी भगवंतामुळे घडतात आणि त्याकडे मोकळ्या मनाने बघायला लागत. सध्याच्या पिढीचे विचार इतके निराळे आहेत, तर ते तटस्तपणे आणि मोकळ्या मनाने बघितले पाहिजेत. त्यातूनच आकारांचा वेगळेपणा आणि कुठे ते “एकच सत्य बोलत आहे” हे कळून येईल.

भगवंत होणे हि क्रिया सरळ कदाचित आपण स्वतःसाठी केलेली नाही – ती बर्याच अंगाने, कालांतराने जाणवते. त्यासाठी श्रद्धा वाढवत राहायला लागते.

हरि ओम.

 

 

0 Comments:

Post a Comment

<< Home