श्री
श्री
आत काय सुरू असते आणि त्याचे स्पष्टीकरण देणे हे अक्षरशः अभिप्रेत नाही दुसऱ्यांना बोध देण्यासाठी. स्पष्टीकरण हा मानवी भाव आहे, ज्याच्या अजून पलीकडे शांती भाव स्थित असतो. ह्याचाच अर्थ स्पष्टीकरण विलीन झाल्यावर किंव्हा विलीन होत राहताना शांती भाव संक्रांत होऊ पाहते.
स्पष्टीकरण भावाचे मर्यादा आहेत, हे नैसर्गिक आहे. परावलंबनाचे स्वरूप काय असते आणि अहं वृत्ती, ह्याच्या क्रियेतून स्पष्टीकरणाची "गरज" निर्माण होते.
शुद्ध अंतःकरण झाले की स्पष्टीकरणाची गरज विलीन होते.
तसे पाहिले हा मार्ग महत्त्वाचा आहे. प्रपंचाचा अनुभव असतो, म्हणून शांत होण्याची गरज किंव्हा शोध निर्माण होते. ते कुणी सांगत नाही की असे करावे की ते करावे. ग्रंथ लिहिण्याचे प्रयोजन असे की *मार्ग दर्शन* व्हावे, स्पष्टीकरणाचा रंग प्रज्वलित न राहावे.
काहीना तो मार्ग लिहून जाणवतो, काहीना आपुलकी व्यक्त करून, काहीना कार्य करून, काहीना कामातून.... _मार्ग निश्चित आहे_. तो जाणून घ्यावा.
हरि ओम.
श्री
वरील लेखनाचे बऱ्याच पद्धतीतून चिंतन होऊ शकते...
प्रत्येकजण त्याच्या प्रवासात असतो. तो "त्याचा" प्रवास होतो अनंत क्रियेने. आणि हे "त्याचे" होणे आणि त्यातून "पलीकडे" स्थिरावणे हा झाला जीवनाचा मार्ग. ते होण्यासाठी जे अनुभव येऊ पाहतात, जी परिस्थिती असते, जे नाती असतात, जे प्रारब्ध असत, जे स्मरणात येऊ पाहते, ते एकंदरीत मार्गावर नेण्यासाठी _प्रवृत्त_ करते. प्रवृत्त हा भाव त्याच क्षणात कदाचित कळू नाही शकत (आणि कळण्याचाही अट्टाहास सोडावा). खूप त्रासातून जाऊन, वृत्तीचा परिणाम भोगून, जेव्हा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा ती प्रवृत्त भावना जागृत होते, किंव्हा आपली बघण्याची नजर बदलते. म्हणजे आपण मार्गावर आहोत, हे खूप अनुभवातून गेल्या नंतर ओळखायला येतं...तरी ते भाग्य आहे आपले, हे निश्चित. कारण त्यातून आपण डोळसपणे अनुभवाकडे बघायला लागतो. ओळखणे ही बुद्धीची क्रिया फक्त नसून, ती जाणिवेशी निगडीत आहे.
आयुष्य हे सरळ नसते, किंव्हा ज्याला आपण सद्या सरळ समजतो, ते तसे नसते. असे का कारण वृत्तीमुळे मर्यादित कार्याचा अर्थ आपण लावतो. कार्य हा भाव सर्वांच्या पलीकडे स्थित असतो. म्हणून सरळ असण्याची जाणीव बदलण्याची गरज असते.
आयुष्य सरळ असण्याची अपेक्षा म्हणजेच सर्व घटकांवर अपेक्षा लादणे - व्यक्तींवर, वस्तूंवर, भावनांवर, क्रियेवर, प्रगतीवर, काळावर, स्थळावर, फळावर वगैरे. तसा _अट्टाहास सोडून द्यावे._
अस्तित्व स्थिती भगवंताच्या शक्तीवर प्रज्वलित राहते, आपल्यावर नाही. म्हणून त्या शक्तीवर पूर्ण श्रद्धा ठेवण्याचा अभ्यास सतत करावा. गोष्टी होतात योग्य, आपण असो किंवा नसो, आपण काही करो किंवा नको. त्या होण्यावर श्रद्धा असू द्यावी.
कसे कार्य करावे, हे जरी कळले, तरी ते योग्य घडण्यासाठी सैय्यम आणि प्रयत्न आणि श्रद्धा लागते. कारण प्रत्यक्ष कार्य करत राहताना अनेक विचार मनात येतात आणि लक्ष वेधून घेऊ शकतात. म्हणून स्थिरतेसाठी प्रयत्न करणे आवश्यक.
काहीही लपवता येत नाही. आपण लपवण्याचाही विचार केला, तरीही त्यात इतर चक्र सामील होऊन त्या प्रकारची विपरीत परिस्थिती पुढे पदरी पडते. म्हणून सर्व विचार, हे भगवंतावर केंद्रित करावे, म्हणजे त्याप्रकारे योग्य परिस्थिती अनुभवायला येते.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home