Friday, December 05, 2025

श्री

श्री 

दृश्यात वावरत असताना सर्वांगीण भगवंताचे स्मरण ठेवणे आवश्यक आहे. भगवंत भाव जागृत होण्यासाठी, त्या प्रमाणे गोष्टी कराव्या, म्हणजे तसा परिणाम किंव्हा संस्कार मनावर होतो आणि मन स्थिर होते. जसे की काम करत राहताना, हेतू बघू नये, कर्तव्य करावे. प्रारब्धने जे अनुभव येत जातील, ते स्वीकारणे आणि कर्तव्य करावे. चिंतन करावे, श्रद्धा वाढवत राहावी. गोड बोलावे, सैय्यम ठेवावा, संबंधांवर श्रद्धा ठेवावी. 

काम म्हणजे सर्वस्व नाही. पण जे काही करू, त्यात भगवंताला सर्वस्व मानावे. परिणाम, जे गूढ असते, जे बुद्धीच्या पलीकडे असते, जे दुहेरी असते, ते शुद्ध स्मरण वाढवत करत जावे. योग्य परिवर्तन होईलच.

विचार शुद्ध करावे. ज्यात गुंतून रहाण्याच्या विचार करतो, त्यातून त्या विषयाचे संस्कार, परिणाम होत असतात मनावर. म्हणून संबंधांचे रूप काय हवे, त्यावर योग्य विचार करावे. विषय सोडवणे, कलाकृती करणे, आकार करणे, भूमिका धरणे, स्वतःचे स्वरूप मांडणे, स्पष्टीकरण देत रहाणे, असंतुलन सोडवत राहणे....असे काहीही अभिप्रेत असते का?!! 

आकार करणे, हा काही अट्टाहास नाही. विचार पटवून देत रहाणे, ही काही जबाबदारी नाही. भूमिका सांगणे, ही अपेक्षा असू शकत नाही. दुसऱ्यांना सांगत राहणे, हे ही अभिप्रेत नेहमी असते, असे काहीही नाही. 

हरि ओम


श्री 

विचारांचे स्वरूप, संबंध, परिणाम, अनुभव, द्वैत आपल्या हातात नसते.  The entire scope of thoughts is not in our hands but needs to be accepted fully. ह्याचा अर्थ असा की अनंत विचार चक्राचे स्तर, आकार, संबंध, स्पंदने होत असतात आणि त्यातून स्मरण, भाव प्रज्वलित राहतो आणि परिणाम करतो. त्यातून निष्कर्ष होते आणि त्यातून ठरवले जाते की अस्तित्व कसे वाटते. त्या खूप गहन पद्धतीतून तात्पुरतेपण किंव्हा भीती प्रकट होते. 

म्हणून, पाहिले म्हणजे विचारांची मर्यादा पूर्ण स्वीकार करणे भाग आहे आणि त्यातून शांतीचा मार्ग आत्मसात करण्याचा. 

भगवंताचे संस्कार आत स्थित होऊ शकतात. श्रद्धा वाढवावी.

हरि ओम.


श्री 

आज काल मोठ्ठं संकट असे दिसते की विचारांची मर्यादा मांडणे, त्याचे स्पष्टीकरण देणे, त्यावर टीका करणे आणि ते किती पैसे पुरवतील, हे सांगणे!! म्हणजे विचारांचे रेखाटन करणे आणि तेच सर्वस्व आहे (deterministic) असे वाटून घेणे आणि इतरांवर ओरडत राहणे! 

म्हणजे कुठलेच आकाशाचे रूप किंव्हा धीमेपणा न सोडणे! सर्व विचारांच्या प्रवाहाने गच्च भरणे!! 

मला ह्यातून गुदमरायला होते. आज काल मी ह्या अपेक्षाला दुर्लक्ष करायचे ठरवले आहे, कारण आकाश पूर्ण विचारात भरणे, हे *काही उपयोगाचे नाही*, असे मला वाटते.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home