श्री
श्री
भगवंताचे अस्तित्व, त्याचे ध्यान आणि विचारांचे स्थान - हे तीन गोष्टी आपल्यासाठी मौल्यवान आहेत. त्यांच्यातील संबंध गूढ आहेत आणि ते प्रज्वलित होण्यासाठी मार्ग पत्करावा लागतो. मार्ग पत्करल्यावर वरील तिन्ही गोष्टींचे संबंध स्पष्ट होते आणि योग्य होते.
दररोजच्या व्यवहारात किंव्हा अनुभवात संबंधांचे गुढत्व मनाला स्पष्टपणे ओळखणे कठीण जाते म्हणून दृश्यांची बाधा त्याला होत असते आणि त्यात गुंतणे सुरू राहते. आपण गोष्टींमध्ये का गुंतून राहतो, त्याचे कारण गूढ आहे, अनाकलनीय आहे आणि ते श्रद्धा प्रस्थापित करून गुंतणे _शिथिल_ होते.
मुळात सर्व अर्थ अस्तित्वाशी निगडीत आहे, हे ध्यानात पक्के होणे गरजेचे आहे. नाम घेणे म्हणजे मध्य भागी स्थिर होणे आणि वरील तिन्ही गोष्टींचे स्मरण सतत जागे ठेवणे. त्यातून परिवर्तन होत राहते.
हरि ओम.
श्री
अध्यात्म ह्या दृष्टीने विचाराने परिवर्तन होणे अभिप्रेत असते आणि शेवटी सत्यात राहणे असे असते. म्हणून विचारांना सध्याच्या परिस्थितीत मर्यादा असतात आणि सत्य पासून अंतर असते. तरीही ह्याला दोष मानू नये की ज्यात गुंतायला हवे आणि व्याकुळ वाटून घेणे. ह्याला टप्पा मानावा प्रवासात येणारा. त्यावरून विचारात अभ्यास घडवून, मार्ग जोपासून, शेवटी योग्य विचार संक्रांत होत राहतात आणि भगवंताचे कार्य अधिक स्पष्टपणे ध्यानात प्रस्थापित होते.
ह्याला हरि पाठात देह बुद्धीतून सोहम भाव आणि सोहम भावातून भगवत स्वरूप होणे, असा उल्लेख केला आहे.
कपूराची आरती उजळली ज्योत I
ठायीचीं समाप्ती झाली तैसी II
हरि ओम.
श्री
भगवंत भाव, कार्य, विचार, अनुभव, ध्यान, जाणीव, हालचाली, संबंध - हे अस्तित्वात असण्याच्या गोष्टी आहेत. ह्या सर्व गोष्टी _स्मरण शुद्ध_ होण्यात संबंधित होऊ द्यावे आणि त्यासाठीच परिस्थितीचे प्रयोजन असते, हे ओळखावे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home