श्री
श्री
प्रश्न कसे येतात किंव्हा निर्माण होतात (जे होणारच) आणि त्याला आपण कसे सामोरे जाऊ शकतो, ह्यावर सर्व निर्भर असावे. दृश्यात जर प्रश्न आले, तर त्याचे उत्तर तिथेच व्यवहार करून मिळणार, पण त्यांचे येणे सुरू राहणार. म्हणून प्रश्न का आणि कसे आणि कुठून येतात, हा प्रश्न मुळाचा आहे. प्रश्नांच्या पलीकडे काय वावरत असते आणि त्या माध्यमाचे कार्य कसे असते? त्यातून प्रश्नांची स्थिती होते का? त्यातून मग दृश्य जगातील परावलंबी स्थिती वाट्याला येते का? त्यातून अनुभव होतात का?
असे प्रश्न खूप महत्वाचे असतात आणि कदाचित खूप बेचैन करतात, कारण दृश्यातील कोणत्याही स्थितीत समाधान बुद्धीला मिळत नाही. अशा अवस्थेत, असे म्हणतात, की भगवंतावर श्रद्धा वाढवण्याचा अभ्यास करावा. त्यातून पलिकडची स्थिती अनुभवास येऊ पाहते आणि शांती भाव संक्रांत होऊ पाहते.
ह्यावरून दोन गोष्टी होतात. आपण येणे आणि जाण्यावर धरून राहत नाही. म्हणजे आपली वृत्ती शिथिल होते. त्याचा परिणाम असा होतो की परिस्थिती बदलत गेली, तरी आतील शांती तशीच कायम राहू शकते.
दुसरी गोष्ट की बालपण आणि म्हातारपणाला आपण सैय्यमाने आणि शांतीने सामोरे जाऊ शकतो. दोन्ही अवस्था बुद्धीच्या भाषेच्या पलीकडे असतात, म्हणून तिथे श्रद्धेला खूप महत्व आहे.
म्हणून पटकन काहीतरी करणे किंव्हा पटकन परिवर्तन होऊ पाहणे असे काही पचनी पडणे कठीण स्वतःला. जे नियमाने सातत्य ठेवल्यामुळे मनात संक्रांत होते, ते कायम राहते. म्हणून अभ्यास (म्हणजे मनाच्या स्वभावाला स्थिर करणे) महत्वाचा असतो.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home