Friday, November 07, 2025

श्री

 श्री 


माणसं कधी कधी कुठल्याही विषयावर बोलत राहतात...सर्व त्यांची विचार शक्ती, भावना शक्ती, अर्थ, संबंध, अपेक्षा त्या विषयावर ओवाळून टाकतात....कदाचित असे समजून की त्यातून आनंद मिळू शकेल. ते प्रकरण काही थांबत नाही, कारण ते चक्रासारखे  परिणाम करत राहते आपल्यावरही....म्हणजे किती प्रमाणात व्यवहार होत असतो! प्रतिभा शक्ती आपण ह्या पद्धतीने वाया घालवतो! 

पहिले काम जे करायचे असते, तर ही शक्ती खर्च करणे बंद करायला लागते. म्हणजे ती साठवायला लागते. ती तेव्हाच साठून राहते, जेव्हा मनात सूक्ष्मता येते. शक्ती संचय. 

हे शक्ती संचय होणे महत्वाचे आहे...म्हणजे स्वतः मध्ये रमणे, शांत होणे, अंतर्मुख होणे, स्थिर होणे, श्रद्धेने वावरणे, कार्य करणे, सर्वांसाठी असणे, सर्वांचे भले इच्छा व्यक्त करणे, निरहेतू असणे वगैरे. 

"मी", ह्या भावनाने शक्ती उगाचच खर्च होत राहते. सिद्ध करत राहणे खूप दमणूक आहे आणि ते खरे गरजेचेही नाही...कारण कार्य करणारा भगवंत आहे, मी नाही. म्हणून त्याला शरण जाणे हिताचे ठरते. 

तो अनुभव आत्मसात व्हायला लागतो. त्यासाठी भगवंताची प्रार्थना करायला लागते. 

हरि ओम

0 Comments:

Post a Comment

<< Home