श्री: वृत्ती आणि भगवंत
श्री: वृत्ती आणि भगवंत
वृत्ती खूप सूक्ष्म असतात आणि ते
सर्वांवर परिणाम करतात – त्यात मी, तु, परिस्थिती, स्थळ, काळ असा काही भेद नसतो.
किंबहुना वृत्तीचा परिणाम म्हणायला हरकत नाही कि आपल्याला विश्व आणि त्यात बरेच
घटक आणि आकार दिसून येतात. म्हणून एकदा कार्य करतांना वास्तविक कुठल्या वृत्ती
आपल्या आत निर्माण होत आहेत आणि प्रभाव टाकत आहेत – हा महत्वाचा मुद्दा आहे;
परिस्थिती काय आहे हा मुद्दा दुय्यम आहे.
मी स्वतंत्र (गती म्हणून) मुळीच
नाही आणि स्वतंत्रपणा असणे किवा वाटून घेणे म्हणजेच अभिमान जागृत ठेवणे. माझ अस
काहीही नाही, जे काही आहे ते भगवंताने निर्माण केल आहे – त्याच्या शक्तिमुळे आणि
संकल्पना मुळे आणि अस्तित्वामुळे सर्व कार्यांना चालना मिळत राहते. मुळ शक्ति त्याचीच, त्यातून पदार्थ निर्माण
होणे, घडणे, आकारास येणे आणि मावळणे हे हि त्यांनी ठरवलं आहे, तर उगाचच अहंकार कशासाठी
आणि का?! जे काही होत आहे हे त्याच्या इच्छेनेच
- आपण कोण, का, परीस्थिती, स्थळ, काळ, नाती वगैरे त्याच्यातून येत आहेत – “मी”
माणूस म्हणून असा कोणीही नसतो. “माणूस” हि एक संकल्पना आहे, ज्याच्या आधारे आपण
भगवंता पर्यंत जाऊ शकतो, पोहोचू शकतो, बनू शकतो.
विचार फसव्या ठरू शकतात कारण ते
प्रश्नांमध्ये गुंतवून ठेवतात. का, कोण, कधी, कसं, कशासाठी – ह्या प्रश्नांना अंत
नाही आणि ह्याचाच अर्थ कि हे प्रश्न निर्माण होतात – त्याला तस काही ठोस सत्य कारण
नसत. विचारांच्या पलीकडे जाणे म्हणजे श्रद्धा जागृत करणे अस्तित्वावर.
श्रद्धा जागृत करणे म्हणजे समजून
घेणे कि गोष्टी घडत राहतात आणि ते घडणार आहे ह्या पुढे सुद्धा. आपली वागणूक
गोष्टींवर निर्भर न राहता, त्याच्या पलीकडे असणाऱ्या भगवंताशी असली पाहिजे. म्हणजेच
कि वेळ देणे, संस्कारांवर लक्ष ठेवणे आणि चांगल्याच गोष्टी करणे, आपुलकीची भावना
वाढवणे, स्वतःवर प्रेम करणे, माफ करणे, आनंद देणे, दुसर्यावर टीका न करणे, मदत
करणे, ऐकून घेणे. जे काही होत आहे ते मोकळ्या मनाने स्वीकारणे, नावं न ठेवणे आणि
अश्या असंख्य गोष्टी करत राहणे – म्हणजेच भगवंताचा संस्कार मनात रुजवणे आणि
अधिकाधिक प्रज्वलित करत राहणे.
आपण जन्मभर अभ्यासच करत राहतो –
वृत्तींचा. हि चुकीची समजूत आहे कि ठरलेल्या वेळेतच एखाद्या गोष्टीचा परिणाम होतो
आणि वेगवेगळ्या “कप्प्यांमध्ये” वेगवेगळे परिणाम निर्माण करत आपण एखाद्या ठरलेल्या
परिस्थिती पर्यंत पोहोचू किवा निर्माण करू शकतो (the illusion of the benefit of compartmentalizing
everything – from relationships, to spaces, to time, to work, to distances to
activities and so on). वास्तविक
अस मुळीच घडत नाही – भावनेचे अशे कप्पे करणे वेडेपणा आहे आणि ते घातकही आहे.
संस्कारांना कप्पे नसतात – आपण
कृती किवा कार्य किवा वेळ बदलू, पण मुळातली आतली भावना तीच राहत असते. कुठली भावना
निर्माण होऊ द्यावी हा सर्वस्वी आपला निर्णय आहे. पण शांतपणा हि भावना महत्वाची
असेल तर ती कुठल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकेल हे आपल्याला दिवसभराच्या सर्व
प्रकारच्या कृतीत आणायला लागत.
मुळ हेतू आहे अभिमानाच मरण.
त्यातून गोष्टी सुट्ट्या आणि सोप्या आणि स्वस्थ होत जातील. मी कोण आहे हा चिंतेचा
प्रश्न घालून टाका. मी भगवंताचा आहे म्हणून तो म्हणेल तसच माझ भल होईल.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home