Thursday, July 06, 2023

श्री: शांती

 

 

श्री: शांती

शांती कुठल्याही गोष्टीवर निर्भर नसते. शांती हि एक स्थिर राहण्याची स्थिती आहे आणि अस्तित्वाची जाणीव झाली कि ती मनात संक्रांत होते किवा आपल मन शांत होत. अध्यात्मान हे परिवर्तन होण्याची क्रिया आहे. परिवर्तन आहे ते वृत्ती उमटण्याच. वृत्ती आपल्या ताब्यात हवी किवा ती उमटू देऊ नये – हे दोन्ही पर्याय सध्या होत नाहीत. त्याच्या ऐवजी वृत्ती नुसती येऊ द्यावी, तिचा स्वभाव ओळखावा आणि ती मावळू द्यावी – हे हिताच ठरत. वृत्ती खूप सूक्ष्म असते, जिथे आपली बुद्धी किवा भावना पोहोचू शकतीलच अस नाही. वृत्तीचा परिणाम म्हणजे बुद्धी आणि भावनांचा जन्म आणि साहजिकच तो स्वभाव आपल्या मनावर उमटतो आणि त्या प्रमाणे आपल्याला विश्वाच दृश्य भासत राहत आणि आपण अनुभव निर्माण करत राहतो. जे काही दिसतं राहत किवा जाणवत ते वृत्तींमुळे किवा त्यांच्या परिणामांमुळे आणि त्यांना शांत करणे म्हत्वाच ठरत. शांत होणे म्हणजे नाहीस होणे अस नाही. शांत होणे म्हणजे वृत्तींमध्ये नाही गुंतणे आणि त्याच्या पलीकडच आत्म्याच अस्तित्व जाणवणे. आत्मा किवा भागवत वस्तू अमर आहे, अनंत आहे, अचित्य आहे, अनाहत आहे, सूक्ष्म आहे, सत्य आहे. आत्माच दर्शन हे सर्वात मोठ कौशल्य मानायला हरकत नाही.

आपण कशे हि असो, भगवंतावर किवा आत्म्यावर श्रद्धा ठेवावी आणि ती श्रद्धा आणि त्याची भावना कुठल्याही परिस्थितीशी निगडीत करू नये (आणि नसतेच). नामाच महत्व श्रद्धेने कळेल आणि आपण अस्तित्वात आहोत ह्याचाच अर्थ भगवंत आहे. प्रत्येक माणूस आणि आकार वेगळा असतो आणि वेगळा जरी असला आणि सतत बदलत जरी राहिला तरी तो एकाच सत्यातून आला असतो आणि त्या वेगळेपणामुळे आपण काही कमी होत नसतो किवा वाढत नसतो  - किवा आपण कुठल्याही वृत्तीवर अवलंबून नसण्याची गरज नाही. एखादी कृती घडणे आणि गोष्ट होणे आणि हालचाल होणे  - हे होऊ देणे  - त्यांनी आपल्या शांतीवर धक्का लागत नाही.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home