Saturday, July 15, 2023

श्री: स्थिर होणे

 

श्री: स्थिर होणे

गोष्टी घडणारच आहेत कारण ते अस्तित्वामुळे निर्माण होत राहतात. घडणे – म्हणजे निर्माण होणे – म्हणजे वासनेतून किवा वृत्तीतून आकार घडवणे असं काहीसं होणे. वृत्ती शांत करायला खूप काळ जायला लागतो आणि खूप आत डोकावून बघायला लागत. वृत्तीचे पहलू, त्याचा विस्तार, त्याच चलन – हे एका दिवसाचा खेळ नाही आणि कदाचित एका जन्माचाही नाही. बरेच घटक कळून सुद्धा आपल्याला “राग” किवा “त्रास” होऊ शकतो आणि असा होणे ह्याचा अर्थ मार्ग आणखीन बराच गाठायचा आहे. मला गोष्टी कळल्या आणि आचरणात आणल्या तरीही आघात होऊ शकतात आणि हेच शांत मनाने स्वीकाराव लागत. तात्पर्याने कळणे किवा जाणवणे किवा विचार करणे  - ह्या गोष्टी समजून घ्याला मदत करतात – पुढच्या गोष्टींची निर्मिती थोड्याफार फरकाने बदलू शकतात, पण अस्तित्वावर ताबा मिळवू शकत नाही. जे होणार, ते होणारच आणि ज्या गोष्टी अनुभवास येणार ते योग्य वेळी येणारच.

गोष्टी कुठल्या हेतूने स्वीकारायच्या आहेत आणि काय जाणून घ्यायच आहे तेवढच आपण ठरवू शकतो. तर अस्तित्व म्हणजे अनुभव स्वीकारणे. दुसरी गोष्ट अशी कि बाहेरची कृती आतल्या हेतूची कल्पना सरळपणे देतेच अस नाही. There is no logical way of perceiving things and basing our own conclusions. “हि गोष्ट म्हणजे अशी वृत्ती” अस मानणे हे चुकीच ठरू शकत.

ज्या व्यक्तीला बौद्धिकरित्या गोष्टींचा अर्थ आणि निर्मितीच कारण कळून घ्यायचं असेल, त्याचा गोंधळ उडणार आहे ह्यात शंका नाही. काय वाटून घ्याव ते आपण ठरवू शकतो कारण गोष्टीच्या उगमाला आणि बदलण्याच्या अवस्थेला अस काहीच ठोस कारण नाही. ह्याचा अर्थ आपण सूक्ष्म होण्याचा प्रयत्न करावा ज्याच्यामुळे आपण प्रश्न विचारणे सोडून देतो आणि नुसत अस्तित्व अनुभवतो. मी बोललो काय, किवा नाही बोललो, कीवा दुसरा बोलला काय, वेळ पाळली काय किवा नाही, मोठ्याने बोलला काय किवा शांत बसला काय – ह्यातून शांतपणा ठरत नाही. मुळात शांतपणा “ठरण्यावर” निर्भर नाही – ते “होण्यावर” आहे (it is a process and not a product or a full stop).

आपण बर्याच गोष्टींची काळजी करतो – लोकांची, स्वतःची, कार्याची, पैशाची, खाण्याची, बोलण्याची...अस करू नये. त्रासामुळे गोष्टींमध्ये बदल करायलाच हवा अस नाही आणि एका पद्धतीने गोष्टी घडल्याच कि सुख मिळेल असही नाही. म्हणजे आपल चित्त स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा आणि स्थिरता वृत्ती, स्थळ आणि काळाच्या पलीकडे जायला हवी. काळ आणि स्थळ बदलला तरीही स्थिरता डगमगता कामा नये. ह्यालाच आपण भगवंत संबोधित केल आहे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home