श्री
श्री
सगळ्या गोष्टी नकळत आणि सूक्ष्म
प्रवृत्तीतून होत असतात – अस्तित्वाची खुण आहे ती. नकळत होतात, मुळ कुठे आहे ते
बुद्धीला कळत नाही आणि होत राहतात आणि असंख्य संकल्पना निर्माण होत राहतात ह्यात
सर्व काही आल – भगवंताच अस्तित्व. म्हणजे जग निर्माण करणारा आणि चालवणारा “तो एक
भगवंत” आहे – ‘मी’ नाही आणि वेगळ कुणीही नाही. उगाचच वाटत राहत कि मी सर्व काही
करतो आणि ताबा असतो पण तसं काहीही नसत आणि हेच मुळात आनंदाने स्वीकाराव लागत.
स्वीकारतांना भगवंत आणि मी वेगळे नाही, कारण “स्वीकारण्यालाही” वेगळेपणा येतो.
थोडक्यात सांगायचं झाल तर आपल्या वेगळेपणा वाटतो तो भास आहे – सत्य नाही. आणि
वेगळेपणा अनुभवतो हि एक मानसिक स्थिती आहे ज्याच्या मध्ये वृत्ती, विचार, भावना,
अश्या गोष्टी उमटत राहतात, बदलत राहतात आणि मावळतात. म्हणजे सर्व काही एक शक्ति हि
कार्य करत राहते.
म्हणून काय होत राहत ह्यात चलबिचल
होईण्याची गरज नाही. मुळ शोधण्याचीही गरज नाही, काळजी, तळमळ, चिंता, त्रास – ह्या
भावनांना काही स्थान देण्याचीही गरज नाही. उगाचचं सतत सिद्ध करणे, पळणे आणि
झपाट्याने कृती करत राहणे – ह्याची काहीही गरज नाही आणि हा एक प्रकारचा रोग आहे.
जितका जास्त वेग, तितक्या गोष्टी अपल्या हातात येतील - हा भ्रम आहे. गोष्टी कधी आपल्या तालावर नाचत
नसतात आणि जे दिसतं राहत त्या वृत्तीही उद्भवत राहतात. वृत्ती न येणे – ह्याला आपण
काही करू शकत नाही; वृत्ती तृप्त होणे ह्याला हि काही उत्तर नाही; वृत्तीमुळे
कार्य न घडणे हे हि अशक्य आहे. तर मग हा सगळा प्रकार आहे तरी काय?
वास्तवीक वृत्ती शांत करणे आणि आपण
त्याला न चिकटणे हे महत्वाच आहे. वृत्ती येतील; काहीतरी निर्माण करतील; आपल्याला
वेगळ पाडतील; गोष्टी दाखवतील; आकार निर्माण करत राहतील; तात्पुर्तेपणा दाखवतील आणि
पूर्ण जग नाचवत राहतील. ह्या सर्व गोष्टींना आणि संकल्पांना सामोर जायचं आहे
शांतपणे. आणि ह्या गोष्टींचा दररोजच्या व्यवहारा मध्ये काय अर्थ आहे हे शोधून
घायला लागेल. आपण कोण आहोत; तात्पुरते आहोत म्हणजे काय; आकार आणि भावना एकच आहे
का; त्या का निर्माण होत राहतात; बदल का होतात; आपल्या मनाच्या कोण कोणत्या स्थिती
असतात; सूक्ष्मातून स्थुलात आपण कशे येतो आणि बदल कसा घडतो; आणि असे असंख्य
प्रश्नांची उत्तर कळून घ्यायला लागतात. हे कळणे म्हणजे आपल्या मनाच परिवर्तन होणे –
माहिती नाही.
आपल्याला काहीही सांगता जरी नाही
आल आणि अर्धवट माहिती जरी असली आणि तीही सिद्ध करता नाही आली तरीही सत्य बदलत नाही
आणि त्यावरून आपण काही वेडे ठरत नाही आणि आपल्याला काही करण्याची गरज नाही; न्यून बाळगण्याची
गरज नाही आणि सिद्ध करण्याचा प्रश्नच येत नाही. आपण शांत रहावं.
सत्य भगवंतच आहे. आपण श्रद्धा ठेवत
जाणे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home