श्री: फुकट समर्थन
श्री: फुकट समर्थन
काही विचार मराठी आणि इंग्रजी
मध्ये मांडायला हरकत नाही. आपण जे बघतो आणि ऐकतो आणि संवाद साधतो – त्या मागे
कितीतरी गोष्टी अवांतर स्वतः मध्ये निर्माण करत राहतो आणि त्या निर्मिती मुळे आपण
गोष्टी अनुभवतो किवा हेतू दर्शवतो जगण्याचा. हे जरी सरळ वाटत असेल समजून घ्यायला
तरी ह्या निर्मितीच्या गोष्टी खूप खोलवर आणि सूक्ष्म पातळीवर होत असतात – बर्याच
वेळेला बुद्धीच्या पलीकडे होत राहतात आणि म्हणून आपल्या “नकळत” निर्माण होतात – ते
सर्व काही म्हणून गूढ ठरतात. “नकळत” म्हणजे जे बुद्धीच्या शक्तीला जाणवत नाही
तरीही त्या गोष्टींच अस्तित्व असत. आपल्याला बेचैन करत राहत म्हणजे ह्या
निर्मितीच्या गोष्टी आणि आपल्यावर होणारा परिणाम आणि आपलं गोष्टींना चिकटणे आणि
त्यातून काहीतरी प्रक्रिया व्यक्त करत राहणे – हे चक्र चालूच राहत. हे जरा खोलवर
बघू आता –
बर्याच गोष्टी आपल्या हाता बाहेर
वाटत राहतात आणि होतातही – सर्व गोष्टी दृश्यास येणे शक्य नाही आणि आले जरी, तरी
ते खूप वेगळ्या हेतू घेऊन आणि आकार घेऊन पुढे उभे राहतात. म्हणून आपण स्वतःला
त्रास का करून घ्यायचा? त्रास करून घेतो म्हणजे अपेक्षा करतो कुठल्यातरी फळाची
किवा कार्याची किवा समजून देण्याची. दुसरे व्यक्ती कुठल्या हेतूने काम करतात आणि काय करतात आणि काय सांगतात आणि
कसे विचार करतात त्याबद्दल आपण स्वतःला जवाबदार ठरवण्याची काही गरज नाही आणि मुळात
“दुस्रेपणा” आणि “स्व” ह्याचा जरी नात असलं तरी ते “थेट” नाही किवा त्यावरून कोणी
जवाबदार ठरत नाही. हि महत्वाची संकल्पना आहे कारण दृश्य कसं उद्भवेल, काय दाखवेल,
कस बदलेल, काळ कसा दर्शवेल आणि त्यात आपलं काय होईल - ह्याचा त्रेढा बुद्धीच्या हातात नाही किवा
भावनेच्याही हातात नाही किवा कुठल्याही दृश्याच्या हातात नाही. म्हणजे आपण जसे
आहोत, बुद्धी आणि भावना घेऊन – त्यातून आपला कश्यावरही हक्क सिद्ध होत नाही आणि
करूही नये.
सिद्ध करणे हि बुद्धीची मागणी आहे,
खोल भावनांची नाही. जशी बुद्धीच्या शक्तीला आपण प्रगल्ब करतो तस आपण बेचैन होत
राहतो, त्रासिक होतो, कष्ट सोसतो, आणि एकटे पडतो. त्यातून आणखीन त्रास होत राहतो. बुद्धी
“स्थिर” नाही आणि कुठलीच गोष्ट – वृत्तीन पासून ते शरीर पर्यंत स्थिर नाही तर
समाधान कसं मिळेल? हा प्रश्न आहे, उत्तर अपेक्षित नाही कुणाकडून.
सध्या काय होत माहिती आहे का? आपण
खूप धावपळ करतो आणि एकमेकांना चक्क “टाळतो”. कश्याला टाळतो? तर कठीण प्रश्न किवा
परिस्थिती बघवत नाही. का बघवत नाही? कारण त्याच उत्तर काय असेल हे आपल्या बुद्धीला
कळत नाही आणि जरी सत्य कळल तरी स्वीकारण्याची ताकद आपण प्रज्वलित करत नाही. आणि ते
सांगण्याचा जरी प्रयत्न केला तरी समोरच्या व्यक्तीवर पाहिजे तो परिणाम होईल का हि
शाश्वती मिळत नाही. मग अश्या वेळी काय बोलायचं आणि काय काय ऐकून घ्यायचं? असा
प्रश्न वारंवार पडत राहील. जसा आता परिस्थितीचा वेग वाढेल, तर आणखीन असे बोचणारे
प्रश्न पडणार. ह्या सर्व प्रश्नाचं उत्तर आहे कि आपल्याला वेळ द्यायला हवा आणि
आपल्याला कुठेही पळून जाता येणार नाही. आणि आपण अहंकार ग्रस्थ झालो आहोत, जे आपण
मान्य करत नाही आणि आपल्या वागणुकीच फुकट समर्थन करत राहतो. हे कळून सुद्धा प्रश्न
सोसायला लागतात आणि सैय्यम वाढवायला लागतो. त्यामध्ये श्रद्धा, प्रेम निर्माण
करायला लागत – हे करणे भाग आहे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home