श्री
श्री
आपण
बुद्धी मध्ये अडकायला नाही पाहिजे. बुद्धी अशी गोष्ट आहे कि ती विषय निर्माण करते,
अस का, तसं का, कधी, कुठे, कोणी, स्थळ, काळ वगैरे अश्या सारी संकल्पना त्या
विषयावर “लादते” किवा त्यावरून अर्थ निर्माण करते आणि तो विषय फुगवते. हा बुद्धीचा
नैसर्गिक गुण असला हवा. तरीही, त्यातून निष्पन्न काय होत तर सुख आणि दुख आणि ह्या
सर्व वैचारिक धारणेला “देह बुद्धी” संबोधित केल असावं. भक्ती किवा आत्मबुद्धी
म्हणजे विषय सोडण्याची शक्ति निर्माण होणे किवा त्यात न गुंतणे किवा विषय आणि “मी”
अस समन्वय करण्याची गरज नसणे किवा शांत होणे किवा पलीकडचे होणे किवा भगवंत होणे.
आकार
काही वेगळे नसतात – सर्व वस्तूंमध्ये जे निरनिराळे आकार आपल्या मनाला वाटतात,
त्यात एकच सत्य विलसित असत – तेच सगळीकडे सारखेपणाने पसरलेलं असत – तर आकाराला का
चिटकून राहणे? सर्व बदलांच्या पाठीमागे, सर्व गोष्टींच्या मागे, सर्व स्थळ आणि काळ
आणि कृती च्या मागे तोच एक भगवंत आहे.
त्याचा
परिणाम जीवनात कसा उमटायला हवा? दृश्य जगाबद्दलची विशेष ओढ नसणे. कार्य होत राहणे
आणि सर्व गोष्टींवर अमाप श्रद्धा असणे. आपली इच्छा किवा संकल्पना स्थळ, काळ,
परिस्थिती, व्यक्ती, जीव, आकार – ह्याच्या पलीकडे जाणे/ होणे/ असणे. एखादी गोष्ट
केव्हाही आणि कुठेही आणि कुठल्याही
हातांनी आणि कुठल्याही आकारात घडू देणे. त्यावरून आपण ठरत नाही आणि आपली शांतता
त्यावर निर्भर नाही. ह्याचा अर्थ कार्य करतांना मार्यादित हेतू नसणे – तोच हेतू
सर्वव्यापी होऊ देणे. म्हणजे स्थळ आणि काळला आकाराचा अट्टाहास सोडणे, काहीही समोर
येऊ देणे, कुठलाही अनुभव घेण्याची होकारात्मक
भूमिका पत्करणे, कुठलाही वेग स्वीकारणे वगैरे.
In short, we are not at all defined by any imagined
sequence of motion – of us, self, past, future, feelings, intellect, materials,
growth, action – they do not limit us or bind us. Why am I here
and where am I going – is not a question to make ourselves bounded. I am here. I
have become something and I am evolving – whateer the form of that evolution
takes.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home