Friday, November 03, 2023

श्री: बिंदू असायला हवा का?

 

श्री: बिंदू असायला हवा का?

बिंदूचा शोध नसावा. सर्व जीवन हे एक स्थिती आहे अस्तित्वाची (कार्य आहे, आनंद आहे) म्हणून ते सुरु आणि शेवट कुठे होत आणि कुठे सापडत आणि कुठल्या स्थितीत आणि कुठल्या वेळेला – हे सारे विश्लेषण घटक राहतात. वास्तविक शांत होणे म्हणजे ह्या प्रश्नांच्या पलीकडे जाणे आणि आपली शांतता ह्या प्रश्नांवर निर्भर नाही होऊ देणे. म्हणजेच कि शांतता श्रद्धेची क्रिया ठरते, बुद्धीची नाही. किवा श्रद्धा बुद्धीच्या पलीकडे असते, त्याच्या मुळाशी जाते आणि शांततेला कुठलाही गुण स्पर्श करत नाही.

म्हणजेच कि आपल जीवन अपूर जरी भासल, तशी बुद्धीची समजूत आहे आणि म्हणून बुद्धीच्या तर्काने विचार केला तर भीती, चिंता आणि त्रास होणार. पाहिलं हे का ते, अस करू का ते करू, इथे जाऊ का तिथे जाऊ, ते खाऊ का हे खाऊ, असंख्य काम करू का एक काम करू – ते पूर्णत्वाच्या मागे जात राहत आणि बेचैन होत.

वास्तवीक “बिंदू” नसणार, कारण तसं जर असत तर निर्मितीच झाली नसती आणि विचार किवा भावना उद्भवलेल्या नसत्या! किवा “बिंदू” ह्याचाच अर्थ कि बदल होणे आणि अपुर असणे. मी आलोच मुळी दृश्यात, तर सुख दृश्यामधून कसं मिळेल आणि तृप्त पद्री कस पडेल? हा विचार आत खोलवर पाचला कि एका वेगळ्याच पद्धतीने शांततेचा शोध सुरु होतो, ज्यामध्ये परिवर्तन होण्याला महत्व आहे.

कुठल्याही प्रश्नांची उत्तरे माहीत नसून सुद्धा शांत राहता येत. आपल्याला काय वाटत असत ते सांगता जरी नाही आल आणि दुसर्यांना कळल नाही आणि बदल होत राहिला तरी त्याने आपल सिद्ध होणे किवा गुण धर्म ठरणे – अस काही होत नाही. शांतता कुणावर किवा काश्यावरही निर्भर नसते. ती ज्याने-त्याने स्वतः मिळवायची असते. मिळवण्याचे मार्ग असंख्य.

कुणी काहीही बोलल त्याने आपण ठरत नाही आणि मनाला लाऊन घेण्याचीही गरज नसते आणि त्याही पलीकडे सिद्ध करण्याचीही गरज नसते – हे सर्व विचार देहबुद्धीतून उमटतात. आपल्याला उत्तर किवा सत्यपणा माहीत नाही (बुद्धीला) म्हणून न्यून बाळगण्याची गरज नाही – त्याने कुणी न्यून ठरत नाही. कुणी कुठे पळून जात नाही आणि वेळ संपत नाही आणि स्थितीही. जे काही आहे तो बदल आहे, अनुभव आहे आणि भगवंत आहे. सर्व भगवंत करतो.

श्रद्धा असावी.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home