श्री
श्री
अस्तित्वाचे उत्तर सर्वांगीण चिंतन करून उमगु शकते. आपण कोण आहोत, कुठून आलो आहोत, कुठे जाणार आहोत, ह्या हालचालींचा भाव जाणवायला हवा. त्या मार्गावर जाताना बरेच अनुभव, रूप, आकार, संबंध, प्रश्न, निर्णय ध्यानात येत जातील आणि बदलतही जातील. हे येणे आणि जाणे आणि बदल पावणे आणि साखळी, चक्र, परिणाम ध्यानात येणे - जाणिवेत यायला हवे. Awareness.
ह्यातील वरील कुठलाही घटक अस्तित्व शक्तीमुळे कार्य करत राहतो, संबंधित असतो, वावरत राहतो, _दर्शन_ देतो. इथे "दर्शन" म्हणजे संबंध, भाव, चक्र, कार्य, स्थित असणे - ह्याचा _परिणाम_ होणे मनावर. In this way, a _form_ gets perceived and conceived.
अस्तित्वाचे विश्लेषण मनाच्या शक्तीवरुन मांडता येऊ शकते. मूळ तत्व काय आहे , त्याचा अनुभवच संक्रांत होणे गरजेचे असते. म्हणून कशाचीही दृश्यात शाश्वती देणे शक्य नसते, किंबहुना सर्व देवावर आधारित आहे, असे _स्वीकारणे_ हिताचे ठरते. स्वीकार होणे, ही देखील क्रिया आहे, ठिकाण म्हणून बघू नये. त्या अर्थाने स्थळ आणि काळ "ठिकाण" नसावे, त्यांना लवचिक स्थिती मानायला हरकत नाही, जी भगवंताच्या इच्छेमुळे रूपात येत राहते.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home