Sunday, October 04, 2026

श्री

 श्री 


शंका आणि आपुलकी मध्ये मूलभूत फरक असा असावा की आपुलकीतून भगवंताचे स्मरण प्रज्वलित राहते, मग परिस्थिती काहीही असली तरीही. म्हणजे आपुलकीचा खरा अर्थ हा की विचार सूक्ष्म आणि स्थिर होणे, अमर्यादित होणे, अस्तित्व भाव आत्मसात होणे, सैय्यम वाढणे, प्रयत्नात कमी न होणे, कर्तव्य करत राहणे, अपेक्षांची गरज न भासू देणे, वगैरे....थोडक्यात सतत नामाचे स्मरण ठेवणे.

अस्तित्व ही शक्ती आहे आणि तिचे खूप स्तर, सूक्ष्म ते स्थूल रूप असतात ज्यामुळे हालचालींची व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीत प्रस्थापित होते. हे एकदा कळले, की समजून घेणे की शक्ती काय करू शकते आणि तिला शुद्ध कसे करावे. 

म्हणजे सर्व प्रकार असा ओळखावा की शक्ती कशी शुद्ध करत रहावी आणि त्यासाठी कुठले संस्कार पोषक ठरू शकतील...

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home