श्री
श्री
मला विघटन अनुभवायला येत आहे. प्रत्येक जण, कुठेही जा, त्याच्या कोषात, क्रियेचे स्पष्टीकरण नाही देणे, त्याला काही विचारले तर त्या व्यक्तीने प्रतिकार देणे, समजून घेण्यासाठी वेळ न देणे, सतत ओरडणे किंव्हा गप्प राहणे, ताबा मिळवणे, नियंत्रण न राहणे, काय महत्वाचे काय नाही असे ठरवणे अवघड होणे, सार्वजनिक चर्चेला दुय्यम समजणे वगैरे, असे जाणवते.... ह्याचा त्रास मला होतो कारण अशा वातावरणात चर्चा होत नाही, नुसते मतभेद होतात आणि विवेक बुद्धीला चालना मिळणे कठीण....आणि हे सर्व ठिकाणी आहे.
ह्याचा अर्थ की समाजात खूप विघटन होत जात आहे आणि प्रत्येक कृती त्या वातावरणाचा छाप आणत आहे आणि परिणाम करत आहे. ह्याने अजून विघटन वाढेल आणि मनस्तापही.
इथे प्रश्न असा निर्माण होतो की आपण व्यक्ती म्हणून काय करावे? कारण सध्या काहीही केलं, कितीही शुद्ध हेतू ठेवला, तरीही दुसरा त्यात स्वार्थी हेतू बघणारच आणि मतभेद व्यक्त करणार. म्हणजे दोघांमध्ये समतोल निर्णय गाठणे खूप कष्टाचे होत राहणार आहे. To resolve this you either keep on aggressively shouting or you completely withdraw and both actions are limited and harmful for the society. Actually those actions express personal intent.
तिसरा मार्ग हा की योग्य काय असावे ह्याचे भान ठेवून कर्तव्य करावे आणि फळ जे काही मिळेल ते स्वीकारावे. हे जे काही करत राहतो "आपण" ह्या पार्श्वभूमीतून आणि जे काही व्यवहार होतात, जी काही वैचारिक आणि भावनिक "साखळी" होऊ पाहते, ती भगवंताच्या माध्यमातून प्रकट होते. म्हणून परिस्थितीचा त्रास करून न घेता, आपण शांतीने कार्य करावे.
अर्थात ह्याला अपार सैय्यम लागणार आणि श्रद्धा. त्यासाठी नामस्मरण करत राहावे.
हरि ओम.
श्री
द्वैताचा अनुभव किंव्हा विघटनाचा अनुभव *गती* निर्माण करतो,बदल आणतो, चक्रात ठेवतो, विचार आणि भावना आणतो आणि प्रपंचात गुंतवून ठेवतो. हे एक प्रकाराचे स्मरण आहे त्या शक्तीचे. अर्थात हे कार्य आहे, जिथे विघटन ही क्रिया होत राहते, बदल असतात, संबंध येतात आणि प्रतिक्रिया देऊन परिणामांना सामोरे जायला लागते.
अशा सऱ्या मनस्थितीत वावरत राहताना आपल्याला सत्य कळणे महा कठीण, कारण आपण वेगात इथे तिथे जात असतो (वृत्ती आणि विचार) आणि कुठलातरी स्वार्थी हेतुला धरून ठेवतो. हे धरणे जे आहे, ते खूप गूढ क्रियेतून उद्भवते ज्यात अनेक स्तर, साखळी, चक्र, इंद्रिये, देह संबंधित असतात. म्हणून त्यातून सुटण्यास किंव्हा शांत होण्यास प्रयत्न आहेत.
शांत होणे म्हणजे सूक्ष्म होणे आणि गती विलीन होणे. ते झाल्यास सत्य आत्मसात होते. तो पर्यंत आपण स्वतःवर लक्ष केंद्रित करून अंतर्मुख होत राहणे.
जी प्रपंच किंव्हा परिस्थिती दिसते, त्यात गुंतून मिळून काय मिळते?! ते चक्रच आहे! त्याला ठोस अशी काही सुरुवात नाही, आणि अंत ही नाही!...कारण हे *कार्य* आहे, भगवंताचे आहे. कार्य असण्यास हेतू नसते, ते फक्त असावे. अस्तित्वात अशी एकच गोष्ट असावी की नुसती असते, आणि ती म्हणजे "शांती".
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home