श्री
श्री
मला दररोज स्वतःला सांगायला लागते, की उत्तर देणे किंव्हा प्रतिक्रिया देणे अभिप्रेत नाही. देहाचे वाढत्या व्याधींचे प्रश्न म्हणा, बुद्धीचे प्रश्न म्हणा, भावनांचे प्रश्न म्हणा, लोकांचे प्रापंचिक समस्या बघा, कामाची व्याधी बघा, दररोजच्या बदलांचे रूप बघा.....आपण उतावळे होणे अपेक्षित नाही. कर्तव्य अवश्य करावे, पण त्यातून घडणाऱ्या फळांना मनाला लावून न घेणे.
दररोज उठल्यापासून ते निजेपर्यंत समस्या किंवा कोडी दिसून येतात - व्याधी, वृत्ती, स्वभाव, काम, हेतू, परिणाम, मान किंव्हा अपमान...काहीही असो. प्रत्येक गोष्टीशी झुंज करायची ठरवली, तर दमणूक होईल आणि मग प्रश्न असा येतो की हे अभिप्रेत तरी आहे का?! आणि एवढं का मागे लागून घेणे आणि कोडी सोडवण्याचा अट्टाहास धरणे? प्रश्न गूढ आहे...उपाय कुणीही ह्यावर सहज देऊ शकेल गणिता सारखे, आणि मग आपल्याला वाटेल की आपण मूर्ख होतो की इतके साधे करू शकलो नाही.
वस्तुस्थिती ही आहे, की आपण खूप गुंतले गेलो असतो कुठल्याही परिस्थितीत, म्हणून कोणताही बाहेरील उपाय योग्य ठरत नाही. ह्यातूनच अभ्यास असतो, की मार्ग कसा असावा हा सर्व गोष्टींकडे बघण्याचा? आणि मग तो अनुभव घ्यायला लागतो.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home