श्री
श्री
अस्तित्वाची आठवण सतत असायला हवी. ती आठवण सर्वांगीण, सर्व स्तरात, सर्व संबंधात, परिमाणात, स्वभावात व्हायला हवी. आठवण म्हणजे कार्य, साखळी, भाव, संबंधांचे रूप, सूक्ष्मात रमणे. भेद जो सध्या वाटतो, त्याला बघण्याची प्रवृत्ती बदलायला हवी. भेदाला खरे मानले तर पदरी व्याकुळता आली. भेदाला भगवंताची इच्छा _ओळखली_, तर शांती संक्रांत झाली मनात.
Mind is a medium to create a _perception_ of truth. Perception is accepted as truth and it is many times, fiercely guarded. Perception is a means by which all actions take place - even of birth and death. Therefore in a way, perception extends from inner world to outer world. Perception is not found as a point, but is a vast network of limitless vibrations.
वरील वृत्तीत असे दिसून येईल, की त्यात खूप गुंतायला होते. हीच प्रवृत्ती सूक्ष्म आणि विशाल होऊ द्यायची असते, म्हणजे मन सूक्ष्म आणि शुद्ध होते आणि मर्यादित स्मरण राहत नाही. त्याला शुद्ध अस्तित्व भाव संबोधले आहे.
हे आत्मसात होण्यासाठी, ज्या कृपेची गरज असावी लागते, ती नामस्मरणाने जागी होऊ शकते.
हरि ओम.
श्री
भगवंत सत्य आहेच, सध्या त्याकडे _संकल्पना_ अश्या दृष्टीने बघायला होते (म्हणजे सत्य अस्तित्व भावात आणि आपल्यात/ जीवात अंतर असते). म्हणून नाम ह्या संकल्पनेत पहिले निश्चयाने घ्यायला सुरू करावे लागते. कुठल्याही वस्तूत, पहिले संकल्पना ह्या पद्धतीने संबंध जोडले जातात. नंतर ती संकल्पना सर्वांगीण पसरून, सर्व स्तरात जाऊन त्याच्याशी एकरूपता होते. हा झाला _प्रत्यक्ष अनुभव._ त्या अर्थाने मग, संकल्पना पाहिली पायरी झाली आणि प्रत्यक्ष अनुभव शेवटची.
म्हणून नामाचा प्रत्यक्ष अनुभव होणे आले. म्हणजे त्याचे कार्य सर्वांगीण आत्मसात होणे आले...म्हणजे त्यातून विलीन होणे किंव्हा परिवर्तन होणे अभिप्रेत आहे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home