श्री
श्री
अस्तित्व आणि त्यातील सामावलेल्या निर्माण क्षमता कार्य म्हणून ओळखावे. त्या कार्याला भगवंताची इच्छा असेही संबोधले आहे.
त्या कार्याचे रूप म्हणून _जीव_ अशी संकल्पना निर्माण होत राहते आणि त्या निर्मितीमुळे "मर्यादा" येते, कवच येते, भाव होतो, व्यवहार होतो, परिणाम होतो, भोग येतात, प्रवाह जाणवतो, प्रवास संपादन होतो, स्थळ आणि काळ जाणवते, संबंध प्रस्थापित होतात, वगैरे. थोडक्यात _अनुभव_ प्रस्थापित होत राहतात.
त्यावरून बऱ्याच काही विचार, प्रश्न, विषय, भावना येतात, तात्पुरतेपण वाटते, वेगळेपण वाटते वगैरे. मूळ परिस्थिती किंव्हा मूळ कार्याचे बीज खूप गूढ असते आणि सूक्ष्मातून येत असते. तिथून _संबंध_ येतात.
सांगण्याचे तात्पर्य हे की अनेक स्तर असल्यामुळे आपल्याला भ्रम होतो कर्तेपणाचा. ती आसक्ती कमी झाली, की सत्य पचनी होते. अनुभव भगवंत देतो. ते ध्यानात येऊन, भगवंताचे स्मरण सतत ताजे ठेवत रहावे. इथे स्मरण म्हणजे सत्य कार्य ध्यानात येत राहणे आणि तसे व्यवहारात संबंध जोडणे.
हरि ओम.
श्री
वाटचाल बुद्धीने होते. ह्याचा अर्थ "मी किंव्हा अस्तित्व भाव ही बुद्धी नाही आहे". म्हणजे बुद्धीची शक्ती विवेकशील पद्धतीने वापरावी. आपण रूप नसतो ह्याचा अर्थ रूपातून सत्य कसे जाणून घेता येईल, ह्या चिंतनात रहावे. रुपामुळे, बुद्धीमुळे, भावनेमुळे दृश्याशी संबंध प्रस्थापित होते आणि तसे स्मरणही होत राहते. म्हणजे सत्याचा (किंव्हा त्या दिव्य इच्छेचा) "विसर" होतो आणि त्या ठिकाणी अहं भाव येतो.
अहं भाव विलीन होण्यासाठी सत्याचे सतत चिंतन करावे लागते. त्यासाठी प्रयत्न, प्रश्न, टीका, श्रद्धा, सैय्यम, आपुलकी, धीमेपण - ह्याचा सदुपयोग करावा लागतो. ते आपले संपूर्ण भाव विश्व होऊ द्यावे लागते. त्यातून परिवर्तन होत राहते आणि सत्यात विलीन होता येते.
हरि ओम.
श्री
प्रश्न आणि जीवाचे रूप ही एकच साच्यातून आलेली गोष्ट मानायला हवी. प्रश्नांमुळे शोध होतो, द्वंद्व युद्ध सुरू राहत, वेगळेपण आणि तात्पुरतेपण समजून घ्यायला लागतं, भावाचा अर्थ आत्मसात करायला लागते, श्रद्धा वाढवायला लागते, आसक्ती किंव्हा वृत्ती भगवंतात विलीन होऊ द्यावी लागते, वगैरे.
त्या अर्थी अनुभवाचे, दृश्याचे, त्यातील निर्माण होत राहणारे प्रश्नांचे महत्व असते. प्रश्न आहेत, म्हणून शोधातून अंतर्मुख व्हायला होते आणि भगवंतात विलीन व्हायला होते. Realization.
आपले अनुभव अनुमान मानून वाटचाल सुरू करावी. ती वाटचाल बुद्धीने होऊ पाहते. ह्या दृश्यात अनंत खुणावणारे जिन्नस ध्यानात येत राहतात. Distractions. त्यात शांत राहून स्थिर होण्याचा ध्येय पत्करावा लागतो. म्हणून भगवंताचा आधार पत्करावा.
हरि ओम.
श्री
अहं भावनेची वावरण्याची पद्धत असते ज्यामुळे बुद्धी, भावना, देह ह्यांचा वापर केला जातो. पण हे होत असताना कुठल्याही घटकेचा परिणाम दुहेरी होतो - म्हणजे बाहेर आणि आत. म्हणून काहीही झाले तरी _स्वार्थ किंव्हा मर्यादा_ दडून असते. ती खूप सूक्ष्म प्रकृतीतून येत असते, म्हणून त्या भावनेचे गुढत्व शुद्ध झाल्या शिवाय ओळखणे कठीण असते.
बुद्धी त्या मनाने स्थूल आहे, म्हणून तिच्या हालचाली कळून येऊ शकतात प्रयत्न केले तर. पण जे बुद्धीहून सूक्ष्म असते (जसे की वासना किंव्हा स्पंदने), ते सूक्ष्म झाल्या शिवाय कळत नाही. आता बुद्धीला पडलेला प्रश्न असा आहे, की वासना कोण किंव्हा कसे निर्माण होते आणि त्यावरून बुद्धी कशी होते?!
हा प्रश्न आत्मसात होण्यासाठी भगवंताचा आधार पत्करावा लागतो आणि त्याचे माध्यम असते नामस्मरण.
हरि ओम.
Shree
The first thing that a being would do is to create a _boundary_. It is a given, no matter what the situation is, what is the time and what space is being referred to.
One can look at the boundary from various ways - from a division (or a difference or a fragment) to a connected whole, relative, fluid. It is with this, that _perception_ may seem to get established and _realization_ is through this boundary.
Therefore the boundary would arrive and it is required to be engaged with.
Boundary is incidental, it doesn't say anything about existential experience or existential fact. We take the boundary for granted, which is where a _problem_ may seem to arrive.
Why a boundary happens is one of the most fundamental questions probably baffling humankind. I don't know if there's any logical answer to this, yet the boundary can be accepted.
Hari Om.
Shree
Not all things _arrive_ through intellect. Arrival is a good word because, it seems to convey something coming from Beyond and making its way to the intellect and getting transformed or known in the process.
Arrival happens and so does departure. _In between_, there is a notion of 'us'. Therefore, we are _in between_ the coming and the going happening in Existence.
Everything that is experienced can _convey_ this.
Hari Om.

0 Comments:
Post a Comment
<< Home