Thursday, June 08, 2023

श्री

 

श्री

आपल्यावर वृत्तींचा परिणाम (प्रकृती) होत असतो. त्यातूनच आपण होतो, मन होतं, बुद्धी होते, शरीर होतं जग दिसत, अनुभव निर्माण करतो आणि घेतो. हे सगळ एकातएक गुंतलेल आहे. ह्याचा परिणाम किती खोल आहे, विस्तारलेला आहे आणि अनुभव निर्माण देणारा आहे, ह्याची पूर्ण कल्पना होऊ शकत नाही – म्हणून ते गूढ आहे. जे आपण अनुभवतो (किवा ज्याला आपण अनुभव साम्बोधीत करतो) त्याच रुजणं आणि विस्तार होण खूप आहे. हीच सर्व निर्मिती आहे आणि ह्यातूनच सर्व धडपड आणि भीती आणि अभिमान आणि प्रेम येतं.

भगवंत, जे आपल मुळचं स्वरूप आहे, ते ह्यापेक्षा वेगळ आहे. आपण भगवंत आहोत, माणूस नाही. माणूस सोडून मनाची रचना करता यायला हवी मग कळेल कि भगवंत म्हणजे काय ते.

So this calls for some good deal of practice and training to the mind and silencing the vibrations. This action of silencing is to be interpreted and applied through intellect (control, discrimination, analysis and patterns); through feelings (empathy, expansion, Non judgmental, understanding, acceptance, patience, love) and action (commitment, duty, faith, continuance, trust). All these transform the mindset for the better.

तस म्हणल तर आपल्या हातात तसा ठोस काहीच नसतं. उगाचच वाटत कि आपण हे करू आणि ते करू! पुढचा श्वास आपला नसतो आणि श्वास हि भगवंतानेच दिला आहे ना? स्मृती त्याचीच आणि कार्य त्याचच...मग आपल अस काय आहे?! मग “आपण करतो” हे म्हणण चुकीच नाही का?! ह्यालाच भगवंतावरील श्रद्धा ठेऊन कर्म करत राहणे अस म्हणतात. तक्रार बंद होणे आणि आतून शांत होणे हि खुण आहे ह्या क्रियाची.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home