श्री: संकल्पना
श्री: संकल्पना
मला वाटत कि वृत्ती महत्वाच्या
असतात. वृत्तीतूनच आपल्याला वाट अस्तीत्वाची मिळते. मी जसा आहे आणि जो कोणी आहे
आणि जि काही संकल्पना आहे, ती वृत्तीतुन आणि अस्तित्वामध्येच निर्माण होत आहे.
म्हणून संकल्पना येणार, त्यात बर्याच वाटा निर्माण होणार, आपल्याला निर्णय घ्यायला
परावृत्त करणार, आणि बरेच प्रश्न निर्माण करत राहणार. ह्याला त्रासिक होण्याची गरज
नाही आणि पळून जाण्याचीही गरज नाही. सिद्ध करण्याची गरज नाही. आणि आपल्याला काही
औरच दिसत त्यालाहि समजून ‘देण्याची’ गरज नाही. वृत्ती काय दाखवणार आणि काय निर्माण
होणार आणि अनुभव आपण कशे घेणार, हे कुणी सांगाव?! एखादी वस्तू किवा काळ किवा स्थळ
काय दर्शवत आहे – हे त्या त्या वृत्तीवर ठरेल. त्यात बरोबर किवा चूक काही नाही.
मुळात सर्व काही हा संकल्पनेचा खेळ आहे आणि ती संकल्पना एकाच सत्याच्या
अस्तित्वातून निर्माण होत आहे. त्याला कुणी कितीही स्वतःच मन, विचारांचा आणि
शरीराचा पगडा लावण्याचा प्रयत्न केला, तरीही वास्तविक भगवंताची शक्ति आणि त्याच
अस्तित्वच सर्व गोष्टी घडवून आणत राहत आणि जे आपण सोयीस्कर विसरतो!
वृत्ती काळ आणि स्थळ आणि परिस्थिती
निर्माण करत राहते – त्याचा अर्थ असा होत नाही कि काहीतरी त्यासाठी करायलाच
पाहिजे! मुळात जे उद्भवत राहत ते ‘खोट’ किवा तात्पुर्त असल्यामुळे आपल्या संकल्पनेला
तसं ठोस कारण नाही आणि बर किवा वाईट वाटून घ्यायचीही गरज नाही. वृत्ती काय आहे ते
पहिले समजून घ्यायला हवी; तिच्या पर्यंत पोहोचायला हव आणि त्या सूक्ष्म पातळीवरून
जग बघायला हव. तरीही ह्या गोष्टी कश्या घडून येतील हे देवालाच ठाऊक. संकल्पना
असल्यामुळे अट्टाहास करता येत नाही आणि खात्री देता येत नाही. श्रद्धा ठेवायला
लागते. एवढच सत्य आहे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home