श्री: स्मरण
श्री: स्मरण
विचारांचा
उगम हे अस्तित्वाच्या शक्तीतून किवा भगवंतामुळे होतो. आपल्याला ते विचारांच्या
प्रभावामुळे दिसतं नाही किवा जाणवत नाही. ते पटवता येत नाही किवा अनुभवता येत नाही
(मनाच्या शक्तीने). कितीही स्पष्टीकरण दिलं आणि त्यातले घटक स्पष्ट होत गेले, तरी
हेतू मावळला पाहिजे. जो पर्यंत स्व चा हेतू असेल, तो पर्यंत निर्मिती होत राहणार
आणि विचारांची (किवा वृत्तींची) धारा उद्भवत राहणार. म्हणजे शक्ति खूप सूक्ष्म आणि
विशाल असते, जि भावनांना, विचारांना आणि आकारांना निर्माण करते आणि बदल घडवून आणते
आणि त्या गोष्टी लीन होऊन जातात. इथे एक समन्वय समजून घ्यायला हव – सूक्ष्म होणे
म्हणजेच विशाल (किवा सर्व व्यापी) होणे. नाहीस होणे किवा न दिसणे म्हणजे सूक्ष्म
नाही. सूक्ष्म आणि विशाल एखादी भावना झाली कि त्या आकारच अस्तित्व “इतर” स्थितीना/
जीवांना “दिसतं” नाही/ अनुभवता येत नाही. “इतर” हि संकल्पना सुद्धा भावना मध्ये
दडलेली आहे. सूक्ष्म झालो कि सर्व जीव वेगळे वाटत नाही – एकच सत्यातून येत आहेत अस
पटत. म्हणजे आपले डोळे काय बघतात आणि त्यावरून कुठला अनुभव आपण स्वतः मध्ये
निर्माण करतो – त्यावरून आपली स्थिती सूक्ष्म आहे कि स्थूल आहे, हे समजून घेता येत
आणि त्यावरून स्वतःच्या विचारांचा आणि भावनांचा “स्वभाव” समझतो. त्याला विवेक
म्हणू शकू (analysis). विवेक
वापरून काय करायला हव हे कळू शकेल, तरीही त्या वाटेवरून जातांना अनुभवांची खात्री
देता येत नाही. त्यावरून अस स्वीकारायला हरकत नाही कि आपल्याला खरं स्वरूप कळायचं
आहे अस्तित्वाच.
दोन
संकल्पना इथे उपस्थित करत आहे – “स्व” म्हणजेच अस्तित्वाची स्थिती. मग ती आपल्याला
शरीर म्हणून जाणवते कि मन म्हणून कि वृत्ती म्हणून कि शुद्ध शक्ति म्हणून - हि जाणिवेची वाटचाल आहे. जाणीव स्थूल आणि
दृश्य पासून ते सूक्ष्म आणि विशाल होण्याला महत्व आहे.
ह्या
प्रक्रीये मध्ये स्मृती/ स्मरणाची भूमिका बदलत जाते. आपण दृश्य झालो आहोत म्हणून
एका पद्धतीने आपण अस्तित्वाच किवा आपल्या व्यवहाराच स्मरण करतो. त्या मध्ये भगवंताच
स्मरण पूर्णपणे विसरायला होत. त्याला अभिमान म्हणतात. आत्मा हि वस्तू आपल्या
स्मरणात आली, कि दृश्याच विस्मरण होत.
म्हणजे
आपण अस म्हणू शकतो कि अस्तित्व हि स्मरणाची भूमिका आहे. ज्या जीवाला भगवंताच स्मरण
झाल तो जीव म्हणून आकारास येत नाही परत – तो विलीन होतो, त्याची स्मरण शक्ति
स्थिरावते.
हरि
ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home