श्री: कार्य
श्री:
कार्य
शक्ति
आणि अस्तित्व आहे. जे काही आहे इथे, जि काही गती आहे, जे काही बदल आहे, जे काही
विचार आहेत, जे कार्य घडत आहे, जि काही चिंता आहे, जो काही प्रयत्न आहे, जे काही
स्वीकारणे आहे – ते भगवंताच्या शक्तिमुळे आहे. सर्व वस्तूंची निर्मिती – द्वैत आणि
त्याचे परिणाम, त्या अद्वैत भगवन्तामुळे होत राहते.
मी कोण
मला माहीत नाही; हि शक्ति काय मला माहीत नाही; मी कुठे जाणार हे माहीत नाही; पुढे
काय होणार आहे माहीत नाही; बदल कसे समोर येणार आहेत माहीत नाही; कार्याचा परिणाम
काय होणार आहे माहीत नाही; गोष्टींचा मुळ कुठून येतो माहीत नाही – हे सर्व गोष्टी मला/ विचारांना/ बुद्धीला माहीत नाहीत.
तर
प्रश्न असा आहे कि “काय बिघडत जर माहीत नसल तरीही?” का हा अट्टाहास माहीत असण्याचा
आणि गोष्टी बरोबर नमूद करण्याचा आणि सगळीकडे नियंत्रण आणण्याचा?
हा
प्रश्न अध्यात्मिक स्तरावर आत्मसाद करायला हवा, बुद्धीने नाही. वरील प्रश्नांचा
अर्थ असा आहे कि सर्व भगवंताकडे सोपवा आपला अनुभव आणि प्रवास आणि आनंदी रहा. ते
कस, कुठे, कुठल्यापद्धातीने, कधी, कुणामुळे, केव्हा, कश्यासाठी, वगैरे
प्रश्नांच्या प्रभावांच्या पलीकडे येणे गरजेच आहे – आणि ते ही एक सूक्ष्म शक्तिच रसायन आहे. सूक्ष्म
ह्याचा अर्थ असा कि उत्तरांची अपेक्षा न धरता त्या शक्तीवर श्रद्धा वाढवणे; त्याच
अस्तित्व आत्मसाद करणे; त्याच सारख चिंतन
करणे; शुद्ध होत जाणे. बदल, मी, गती, आकार, होणे – हे सर्व भागवान्तामुळे आहे. जे
काही होईल ते चांगल होईल. कार्य करत राहणे आणि ते हि भगवंतासाठी. हेतू न बाळगणे.
चांगलं परिणाम पडेल – ह्यावर श्रद्धा ठेवणे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home