Tuesday, November 28, 2023

श्री

 

श्री

जग असत आणि ते भावनांच्या द्वारे जाणवत कारण ‘मी’ होतो. जसा मी होतो तसा भगवंत वेगळा होतो आणि जग देखील वेगळ वाटत राहत. म्हणजे स्व होण्याच्या क्रिये मध्येच दुसर्यांचा उगम आहे – हे दोन्ही गोष्टी तश्या वेगळ्या नाही. जग कुठल्या पार्श्वाभूमिवर निर्माण होणार आणि अर्थ मिळणार?....माझ्या होण्यावर! जो काही मी आहे, त्यावरून जगाच अस्तित्व, व्याख्या आणि आकार ठरतो. थोडक्यात जगाला दोष देणे म्हणजे स्वतः मध्ये दोषांच स्थान बळकट करणे! निर्मिती हि एक विलक्षण प्रक्रिया आहे आणि गूढ आहे, जेणेकरून अदृष्याच्या स्वभावातून दृष्यमय जगाचा स्वभाव उत्पत्तीला येतो आणि जातो. हे कसं घडत? शब्दात मांडता येईलही, पण त्याने शांतता मिळेल का? ह्या प्रक्रीये मध्ये गुण तैय्यार होऊन आकार घडतात (निर्माण होतात) आणि त्यांच्या स्वभावामुळे आपण भगवंताला विसरतो / अदृष्याला विसरतो/ सुक्ष्म वस्तूला विसरतो. हे जस खरं आहे, तसच भगवंत होणे – हि क्रिया देखील असंभव नाही. त्यासाठी जगाचा स्वभाव, वृत्ती, विचारांचं जाळ आणि परिणामांशी संबंध सोडायला हवा. तो सोडू अस म्हणल तर सुटत नाही. तो सुटत नाही कारण आपण बुद्धीला कवटाळून बसतो. कारण आपण सगुणाला महत्व देतो. ती निर्गुणाची शक्ति अनुभवण्यासाठी भगवंताचे नाम घेत राहणे हि क्रिया चालू ठेवायला लागते. त्याचा परिणाम कसा होतो ह्याची काळजी करून नये.

दुसरी गिष्ट अशी कि सर्व अस्तित्वाच्या आनंदातून साकारल जात. म्हणून आपला मुळ स्वभाव (किवा भाव) तो आहे. आणि त्यातून आपल्याला जे काही शक्य आहे, ते आपण निर्माण करू शकतो. थोडक्यात हेतू निर्मितीचा “आनंद” असला पाहिजे, म्हणजे आपण स्वतः कालांतराने आनंदी राहू.

हरि ओम.

 

0 Comments:

Post a Comment

<< Home