श्री
श्री,
माझ्यासाठी प्रयत्न म्हणजे कि मुळ माहित नसून कार्य करणे. प्रत्येकाला वाटत
(मी पकडून) कि आपण योग्य ते कार्य करतो दिलेल्या परिस्थितीत, तरीही गोष्टी गूढ
असल्यामुळे जो पाहिजे तो परिणाम “आपल्या मनासारखा” होत नाही. म्हणजे आपण स्वार्थी
असतो आणि स्वार्थाच मुळ इतक खोलवर असत कि विचारांच्या आटोक्यात येतही नाही –
किंबहुना “विचारांमध्ये” किव्हा त्यांच उगमेच एक कारण आहे “ स्वार्थ/
बहिर्मुख्पणा/ कर्तेपणा/ अभीमान” वगैरे. हा अभिमान खूप आत असतो, जिथे तो नजरेस
किव्हा दृष्टीस येत नाही (एका वेगळ्याच स्तरावर त्याचा वावर असतो) म्हणून त्याचा
इलाज म्हणजे एका वेगळ्या पठडीतले विचार आणि प्रयत्न आत्मसाद करायला लागतात. विकार
आपण बरेच जन्म/ काळ घेऊन आलो आहोत (चिकटलो आहोत) म्हणून ते पटकन निघण्यासारखे नाही
आहेत. त्यांच्या पर्यंत पोहोचणे म्हणजे आपण सूक्ष्म होत जाणे परिवर्तन स्वीकारणे,
सैय्यम ठेवणे, श्रद्धा वाढवणे असे उपचार संबोधित केले आहेत. जस जसे आपण खोल होत
जाऊ, तसे अभिमानाचे पाया मुळे किती विस्तारलेले आहेत हे जाणवेल आणि त्यांचा उपचार
म्हणजे आवरणे नाही किव्हा त्यांच्याशी वैर पत्करणे असही नाही. फक्त बघणे हे
अभिप्रेत आहे. आणि शांत होत जाणे. दिसत तेवढ सोप्प नाही कारण शांत आणि सूक्ष्म
होण्याचा परिणाम आपल्यावर होणार – तो कसा होणार हे सांगता येत नाही आणि त्यातूनही
श्रद्धा बळकट करत राहणे हे आलच. म्हणून सैय्यम ठेवण्याला खूप शक्ती लागते. स्वतःला
शांत करणे हि सर्वात मोठ्ठी तपश्चर्या आहे.
हरी ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home