Saturday, April 20, 2024

श्री

श्री,

गोष्टींचं उदभ्वणे, होणे, बदलणे, विलयास जाणे हे एका शक्तीच अस्तित्व दर्शवते. शक्ती म्हणजे असणे आणि त्या असण्याला क्रिया संबोधित आहे. एखादी गोष्ट जेव्हा असते, तेव्हा त्याचा स्वभाव किंव्हा क्रिया चालू राहते - ती "नुसती नसते"!

ह्यावरून कळेल की कुठलीही गोष्ट "निर्मिती क्रिया" मधून झाली आहे, ज्याला रूप, गुण, आकार, संबंध, गती, बदल हे गुणधर्म सामील आहेत. "गुणधर्म" - म्हणजे ते गुण असणारच, त्याला तुम्ही किंव्हा मी देखील अपवाद नाही. सगळी सृष्टी त्यात सामील आहे आणि ह्याला एकंदरीत "स्वभाव" म्हणायला हरकत नाही. 

आता ह्या असणेपणाला स्तर आहेत, ज्यावरून क्रियाचा स्वभाव प्रचितिला येतो. सर्वात शुध्द स्तर समाधानी असतं आणि सर्व आकारांच्या पलीकडे राहत. ते आहे, पण त्याचा स्वभाव आत्मसांद केला तर दिसतं, नाहीतर आपण सारे दुसऱ्या स्तरावर राहतो, जिथे क्रियाची हालचाल भोगायला लागते. भोग होणे, हा देखील विधिलिखित नियम आहे. तो होणारच. मग पळून का जावे? आणि कुठे जाणे आणि कश्यासाठी?

गोष्टींची चिंता करू नये, कारण त्यावरून अस दिसतं की आपल्याला अस्तित्वाचा अजून नीटसा स्वभाव कळायचा आहे. तो स्वभाव आपण जाणून घेतला, तर मग आपण शांत होऊ शकतो. अर्थात त्याला प्रयास आहेत आणि त्याच कारण आहे की भगवंताच विस्मरण होणे आणि म्हणून वासनेत जन्म होणे आणि एका स्थितीत वावरणे. ह्या घडामोडींचं रहस्य देखील स्वीकारावं लागतं. 

तरीही दररोजच्या व्यवहारामध्ये काही वेळा लोकांच्या विचार चक्रांच कारण विचित्र वाटू शकेल. त्याने त्रास करून घेऊ नये आणि स्वतःला त्यावरून लेखू नये - दोन्ही क्रिया गरजेचे *नाहीत*. 

गोष्ट, तिची गती खूप गूढ प्रकरण आहे आणि तिला राहू दे जस आहे तसं. त्यात विक्क्षेप करू नये. इथे *प्रयत्न* हा शब्द येतो - मूळ कारण माहित नसतांना, गुणांच्या स्वाधीन राहून देखील (जे अहंकार निर्माण करत राहत), तरीही शांत मनाने कार्य करणे - हे शिकणे महत्वाचं आहे. 

अहंकार निर्माण करणे आणि त्यावरून इतर वृत्ती हे भगवंताने योजिले आहे आणि खेळ मांडला आहे. ही ईश्वर इच्छा आहे, तर त्या वृत्तीलाही त्याच स्थान असावं. तो आपल्यावर परिणाम करेल, त्रास होईल, दुःख होईल, विचार येतील, आणि त्यावरून मूळ स्वरूपा पर्यंत आपण पोहोचू. हा प्रवास आहे. 

आपल्या वाट्याला काय येईल, किंव्हा जे काही येऊ इच्छिते, ते प्रसन्न मनाने स्वीकारणे, कारण त्या घडण्याचा आणि आपण शांत होण्याचा प्रयत्न मध्ये तसा संबंध नसतो (जोडू नये). 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home