श्री: शांतता
श्री: शांतता
शांततेत वावरायला आकार किंव्हा परिस्थिती लागत नाही. म्हणजे आकार किंव्हा परिस्थिती मध्ये पूर्ण शांततेच्या व्यतिरिक्त इतर वृत्ती असतात, परावलंबन करतात. आपण एखाद्या परिस्थितीला किंव्हा आकाराला धरून बसलो, ह्याचा अर्थ कुठल्यातरी आतल्या मनातल्या वृत्तीमुळे ती परिस्थिती किंव्हा आकार निर्माण झाली आहे. त्या चक्रात "मी" गुंततो. वास्तविक सर्व एकच माध्यम आहे, पण दिसताना अनेक आकारांच्या "संबंधातून" ते दृश्यात येतं, आणि जे बदलत राहत. म्हणजे शक्ती सत्य आहे, त्याला संबोधित असलेली संकल्पना "मी" ती तात्पुरती आहे, सत्य नाही. जसं जसा "मी" बदलत राहतो, तस् तशी त्या शक्तीच स्वरूप, अनुभव, जाणीव बदलते. *सत्य* शांत असतं आणि सर्वांच्या पलीकडे. जो पर्यंत "मी" अशी संकल्पना आहे, तो पर्यंत संबंध आहे, बदल आहे, आकार आहे, परिस्थिती आहे, वृत्ती आहे.
वृत्ती कुठून येते? हा प्रश्न विचारणे योग्य आहे, कारण ह्याचा अर्थ की कुठेतरी तुम्ही कबूल करायला सुरुवात करता की वृत्ती म्हणजे "मी" नाही. वृत्ती "मी" ला निर्माण करते, त्याला आकार देते, दृश्यात आणते आणि कार्य करायला भाग पाडते, पण तरीही "मी" हे प्रकरण काय आहे?! ह्याचा शोध घ्यायचा आहे आणि त्या शोधाच रूपांतर म्हणजे शांत होणे किंव्हा शांतता अनुभवणे.
"मी" शांत होतो म्हणजे "मी" विलीन होतो, पलीकडे जातो, मिसळून जातो, विशाल होतो, सूक्ष्म होतो वगैरे. "मी" निर्माण होण्याची गरज राहत नाही, जे असतं ते फक्त सत्य. हा अनुभव कुठूनही सुरुवात करता येतो, कधीही आणि कुणालाही. फक्त, त्या अनुभवाची गोडी लागायला हवी, आठवण हवी, गरज हवी, प्रयत्न हवा, निश्चय हवा, शुध्द जाणीव ठेवावी, श्रद्धा हवी.
ते करणे, त्यासाठी सतत मनाला तैय्यार करायला लागतं. साहजिकच, सध्या आपल्या मनाला बाहेरची ओढ आहे, वृत्तीमुळे. जग ही गोष्ट "निर्माण" होत आहे भगवंताच्या शक्तीमुळे, वास्तव्यमुळे, विलास आहे म्हणून. त्यात "मी" चा संबंध तैय्यार होतो, म्हणून जगाला सामोरं जायला लागतं. असं का, हे ठाऊक नाही, आणि विचारुही नाही; कारण त्या विचारण्यात शांतता निर्भर नाही! सुरुवात किंव्हा शेवट ह्या संकल्पना नाही, त्यावर शांतता अवलंबून नाही. माझ्या होण्यावर शांतता अवलंबून नाही. ती आहेच. अध्यात्मच्या दृष्टीने, "मी" शांततेच्या आढ येतो, म्हणून कधीही ह्या प्रवासाला आपण लागू शकतो.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home