श्री
श्री
स्मरण हा लवचिक भाव आहे. त्यातून शाश्वत स्थितीचे स्पंदने आणि त्यातून बदलत होणारे रूप आणि आकार ह्या दोघांचेही संबंध जाणवतात. स्मरण आपण रूपाचा, आकाराचा किंव्हा कुठल्याही द्वैत अनुभवाचा करू नये. स्मरण जर हवे असेल, तर ते फक्त भगवंताचे असावे, ज्यावरून शुद्ध भाव स्थिरावते आणि मनाचे परिवर्तन होत जाते. म्हणून दृश्याचे स्मरण होत असताना, भगवंताचे स्मरण त्यात मिसळावा म्हणजे तीच जागा, भाव, संबंध भगवंत घेतो आणि मनाला शांती प्रकट होते. ज्याचे स्मरण आपण करू, तीच स्पंदने मनात घट्ट रुजू होतात. त्यावरून निर्णय घ्यावे की स्मरण विषयाचे प्रज्वलित ठेवावे की भगवंत शक्तीचे. हा सर्वात महत्वाचा निर्णय आहे, हे ओळखावे. निर्णय जरी झाला, तरीही शुद्ध अनुभव प्रकट होण्यास वेळ लागू शकतो, त्या मार्गावरून जायला लागते, प्रारब्ध टाळता येत नाही, सर्व स्वीकारायला लागते, हेतू मावळावा लागतो, श्रद्धा वाढवायला लागते...कितीतरी गोष्टी असतात ह्यात अभिप्रेत.
शांत होणे म्हणजे विघटित न वाटून घेणे, तसा विचार न होऊ देणे, तशे संबंध द्वैताशी न जोडणे वगैरे. स्वतःचा कितीही विचार केला, जर हेतू ठेवला असेल, तरीही त्यातून शांती भाव निर्माण होणार नाही. वृत्ती, विचार चक्र, परिणाम, निर्णय कसे प्रभाव घालत राहतात, हे गूढ कार्य आहे आणि ते भगवत इच्छेने साध्य होते.
असे जरी असले, आणि दुहेरी जरी स्थिती असली आणि त्यातून कसेही अनुभव संक्रांत होऊ दिले, तरीही भगवंताचे अस्तित्व खरे असते आणि त्याचे चिंतन करत राहावे, असा उपाय सांगितला आहे. परिस्थिती कशीही जरी बदलत असली आणि तिच्यात कुठल्याही स्थळाचे आणि काळाचे रूप आले, तरी भगवंताचे चिंतन सतत करावे. भगवंत आपल्याला कायम हवा आहे, हे पक्के करावे. गोष्टी येतील आणि जातील, पण भगवंत सत्य आहे.
तिसरी गोष्ट अशी की स्वतःची यातना, स्वतःला स्वीकारायला लागते. स्वीकारण्याचे बरेच रूप असू शकतात...सहन करणे, बोलणे, ऐकणे, कार्य करणे, व्यायामात झुंपून घेणे, वगैरे. आलेले अनुभव भगवंताने दिले आहेत, हे स्वीकारणे आणि त्याच्या चिंतनात वेळ काढावा.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home