श्री
श्री
शांती ही भावना असू शकते. स्वतःच्या भावनेतून तिथ पर्यंत परिवर्तित होता येऊ शकते. परिवर्तन कार्य गूढ असते आणि चिंतनातून, श्रद्धेतून आत्मसात होते. अनुभव हे ही भावना म्हणून वाटू शकतात. त्यांना स्वीकारून शांतीकडे वाटचाल होऊ द्यावी - म्हणजे सैय्यम, आपुलकी, धीमेपणा, हळुवार, कर्तव्य, समजून घेण्याकडे कल, वगैरे. ह्यांचे कार्य परिवर्तन घडवण्याचे आणि काळाच्या वेगाचे संबंध जोडू नये. जर ह्या भावना ठेवून शांती लाभणार असेल, तर ते जोपासू द्यावे.
त्या भावनांचे आणि माहिती असण्याचा काहीही संबंध नाही. उलट संबंध म्हणजे माहिती नाही, पण शांतीचे घटक. म्हणजे शांतीतून आपोआप संबंध येतात. किंव्हा _निर्माण_ होतात. निर्मितीला लेखू नये किंव्हा जबाबदारही ठरवू नये. तसेच संबंध सांगितले तर इतरांना शांत वाटेल, असे काहीही नाही. शांती प्रत्येकाने आत गवसायची असते आणि ते होण्यासाठी कुणाला अडवू नये आणि त्यासाठी स्वतःला लेखू नये.
हरि ओम.
श्री
सूक्ष्मता म्हणजे कुठल्याही रूपाशी, आकाराशी, स्थळाशी, काळाशी निगडित "नाही" - किंबहुना ह्या सर्व सगुण गोष्टींच्याही "पलीकडे". म्हणून ते "निर्गुण" होते - पाण्यासारखे किंव्हा आकाशा सारखे. भाषेतून _पलीकडे होणे_ किंव्हा _नसणे_ ह्याचा अनुभव आत्मसात होणे अवघड. हा अनुभव सर्वांगीण आत्मसात व्हावा लागतो - त्याला विलीन होणे किंव्हा स्मरण विरघळून जाणे, असे संबोधले आहे. इथे मग हे कळून येईल, की "स्मरण" प्रवाह, प्रवास, साखळी, स्तर, भाव, चक्र, बदल, हालचाली, गूढता दर्शवते, ज्यात खूप _गुंतायला_ होते आणि त्यामुळे भोगांचा परिणाम होतो.
मार्गातून स्मरण सत्यात किंव्हा सूक्ष्मतात _परिवर्तित_ होणे अभिप्रेत आहे. _परिवर्तन_ होणे हे भगवत कृपेने होते आणि त्यासाठी सतत आपल्याकडून प्रयत्न, सैय्यम, श्रद्धा, आपुलकी - ह्या गुणांची जरुरी असते.
प्रत्येक घटक स्मरणातील नामाला वेगळ्या पद्धतीने संबंध जोडत असतो. म्हणून नाम घेत असताना परिवर्तन प्रत्येक घटकेत वेग वेगळ्या पद्धतीने होत राहते, अशी _श्रद्धा_ बाळगावी. इथे हे कळून येईल की श्रद्धा सर्व घटकांना, सर्व स्तरात कार्य करते.
आणि इथे असे ओळखले तर कळेल की कार्य म्हणजे "नुसते असणे" - ज्याचा परिणाम खूप गूढ होतो.
हरि ओम.
Shree
Realization is felt in one's decided path of engagement. It can't be forced or fastened etc. This means realization arrives or dawns. This is referred as God's Will and कृपा in Marathi.
We are required to *trust* this process of happening/ evolution/ transformation, so that it will always be accepted by us that all efforts, regardless of the nature of the fruits they generate, are *worth* to be undertaken.
We are called upon to take efforts and those are required to _establish_ realization. Rather, _efforts_ are the only thing, for which, we have become.
In the pursuit/ search of this happening, there would be limitless encounters of many mysterious things at all states of existence. Those are required to be accepted. By accepting those, there occurs a process of transformation. Therefore the object, subject, concept and process are required to merge.
Hari Om.
Shree
*Remembrance* happens, connections happen corresponding to the innermost state of realization. It will automatically _translate_ like that from inside to outside and even reversely.
Therefore if one seems to be comfortable at something - then that could be a way of making complete sense of the world around him/ her...so that should be nourished for him/ her. I think the world offers everything to discover an idea of comfort to the self. So, one has to only listen and be open to that idea.
Now being open comes with all sorts of thoughts, feelings, connections, questions, etc. Allow all of them to interact without any filter of defence.
Then possibly, the magic could unfold, who knows?!!
Hari Om.
श्री
भगवंताच्या कार्याला *खेळ*, अशीही उपमा दिलेली आहे. सगुणात आलो, की त्याचा परिणाम किंव्हा हालचाल खूप होत असते आणि एकंदरीत जीवाला भोग जाणवतात. त्या परिणामातून शांत होण्याचा प्रवास ज्याचा त्याचा जीवानी घ्यायला लागतो आणि तो जो काही वेळ आहे, तो द्यावा लागतो.
भगवंत योग्यच कार्य करत असतो. त्यावर श्रद्धा असावी लागते. दृश्याचे अस्तित्व, संबंध खूप गूढ आहे - ही भगवंताची इच्छा ओळखावी. त्याला अनुसरून आपण कर्तव्य करावे.
मी अस्तित्वाच्या एका स्थितीत _वावरतो_. त्यावरून स्वतःला लेखण्याची गरज नसते. त्यात खूप प्रश्न येतात, व्याकुळता येते, धावपळ होते....काहीही जरी झाले, तरी शांतीचा प्रवास पदार्पण होतोच, आज ना उद्या. जखम खूप आत बोचतील. त्यावर आपुलकीचा हात द्यावा लागतो. विषय सोडावे, म्हणजे सूक्ष्म व्हावे.
हरि ओम.
श्री
एक दिवस आपण विलीन होणार असतो. त्या काळात आतील घटकांचा कोलाहोल होऊ शकतो आणि त्या काळात शांतीचा अर्थ आणखीनच वेगळा ठरू शकतो.
शांतीशी संबंध खूप काळ हाथी घ्यावा लागतो, कारण ते प्रकरण अनेक स्तरांशी निगडित असते. स्तर सूक्ष्म ते स्थूल असे स्थित असतात, म्हणून सर्व स्तरात शांतीचा परिणाम किंव्हा कार्य उमटू द्यायला लागते.
जर आत्ता पासून सवय लावली शांती भाव स्मरणात आणण्याची तर अंतःकाळात ते सहज आठवते आणि तिथेही आपण शांत राहू शकतो. शांत अनुभव म्हणजे रूप, आकार, क्रिया, स्थळ, काळ, प्रवाहाच्याही पलीकडे असतेच, म्हणून ते अनाकलनीय ठरते जीवाला आणि सध्याच्या अनुभवाशी संबंध तसा आपण निर्माण करतो.
म्हणजे थोडक्यात अनुभव भगवंताच्या असण्यामुळे निर्माण होत राहते, स्वतः मुळे नाही.
हरि ओम.
श्री
आतील भावना तात्पुरत्या, बदलणाऱ्या, परावलंबित, अर्थ देणाऱ्या, अश्या संबंधित असतात किंव्हा कार्य करत राहतात. ह्या वावरण्यामुळे मला भीती वाटते, न्यूनपणा येतो, आणि स्वतःशीच झुंज लढवत असतो. त्यात स्वतःला धाऱ्यावर धरतो आणि इतरांनाही. हे कोडे कसे सोडवायचे असा सतत प्रयत्नात राहतो.
असे का होते, हा प्रश्न स्वीकारायला हवा, की ते खूप सूक्ष्मातून, खूप आधीच्या काळाशी निगडित असावे. प्रश्न असणे किंव्हा येणे, हे सूक्ष्म स्थितीच्या कार्यालाही खुणावत असावेत आणि म्हणून प्रश्न ह्याचा अर्थ योग्य मार्ग आणि योग्य परिवर्तन व्हावे. प्रश्नाचे म्हणून उत्तर गूढ परिणामातून येते, फक्त बौद्धिक स्वभावातून "नाही". म्हणून अर्थ किंव्हा होण्याचे कार्य गूढ असते ज्याला बुद्धी पूर्णपणे ओळखू शकत नाही. म्हणजेच की श्रद्धा वाढवावी सर्व सूक्ष्म स्तरात जाण्यासाठी. किंबहुना प्रश्न आले, तर ते भगवंताचा प्रसाद दर्शवते, ह्या भावनेने बघावे आणि स्वीकारावे.
थोडक्यात स्वतःला लेखू नये किंव्हा कष्टी होऊ नये. अनुभवाचे प्रयोजन अस्तित्व शक्तीतून उदयास येते, म्हणून ते स्वीकारावे आणि त्या परिस्थितीत कर्तव्य करत रहावे.
परिणामांची फिकीर असू नये. कर्तव्य केले की परिणाम, मग तो जो काही असो, तो योग्यच असतो.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home