Tuesday, September 16, 2025

श्री

 श्री 


आपल्याला बोलण्याची भूक असते कारण त्यातही कारण गूढ असते. त्याला आपण _कारण_ शोधतो आणि "भगवंतावर" असे सोपवतो. हा झाला तर्क. तो सत्यात बदलू पाहणे, हा झाला अभ्यास. 

अंतर्मुख होताना देखील बदल आणि तात्पुरतेपण जाणवतात. त्यानेही भीती किंव्हा बेचैनी वाटू शकते. ती मलाही वाटते. काय करू ह्या विचारांचे असेही मनात येते. कुणाशी बोलू असेही वाटते. त्यातही अपेक्षांचा रंग असावा, म्हणून असे विचार कदाचित. 

ह्या वरील प्रकाराला स्वतःला दोष न देता बघायला हवे. म्हणजेच की परिस्थिती किंवा अनुभव हे अस्तित्वातील असणारे घटक स्वीकारावे आणि आपण कार्य करत राहावे. त्याचे फळ भगवंतावर सोपवावे आणि जे काही त्यातून घडेल (चक्र म्हणून) ते शांतीने स्वीकारावे. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home