श्री
श्री
आपण नुसते ऐकावे, उत्तरे किंव्हा कोडी सोडवू नये - तसा विचारही आणू नये. ऐकण्यात कुठलीही प्रतिक्रिया देण्याची अपेक्षा नसते, हो ला हो किंव्हा नाही ला हो किंव्हा आणखीन काही. हाच नियम करण्यावर, सांगण्यावर, बघण्यात असावा. निरहेतू किंव्हा शुद्ध जाणिवेतून कार्य करणे.
लोकं झटापटी खूप करताना दिसतात - some sort of desperation to set things right - आणि हे का होतं, त्याला मनाची स्थिती कारणीभूत आहे आणि इतिहास देखील.
कोडी सोडवणे हे प्रगतिशी निगडित झालेलं गणित आहे/ समजूत केली गेली आहे. नवीन, नवीन कोडी दिसतीलच, जसे विभक्त आपण आणखीन होऊ! मग त्यास सोडवण्यास कोणते शहाणपण आले?! म्हणजे पहिले समस्या उभी करावी आणि मग सोडवण्याची धडपड करावी - snowball effect. एक क्षण असा आणायला लागतो की आपण स्वतःला म्हणतो की बास झाला हा वेडेपणा! ह्या चक्रात राहून आपले भले होणार आहे का?! आणि नाही होणार, तर मार्ग कुठला करावा? हा प्रश्न मूळचा आहे.
माझी खात्री आहे की संगणकाच्या बिळात जाऊन शांती निष्पन्न होते, असे काही दिसून येतं नाही सध्या. उलट विचारांचे अधिक विघटन आणि हिंसा दिसून येते. शांत होण्याचा प्रवास जगाच्या प्रगतीच्या उलट दिशेने असावा. हे पूर्ण मान्य करावे आणि त्या प्रमाणे स्थळ आणि काळाकडे बघावे.
आठवड्याच्या शेवटी किंवा कुठल्याही मोकळ्या वेळेस प्रचंड चिंता मला भेडसावून सोडायची...तब्येतीची, आई - वडिलांची, कामाची, सैय्यमाची, असंख्य कामाच्या साखळींची, विस्मृती होण्याची, पैशांची, प्रगतीची, संसाराची, आयुष्याची, बदलांची, घराची, कामाला येणाऱ्या मावशी मंडळींची, एकटेपणाची, 'कुठेही श्वास घ्यायला जागा नाही' ह्या भावनाची, त्रागाची, त्रासाची.... हे न संपणारे विचार चक्र वाटायचे. त्यातून बाहेर येणे म्हणजे काय, ह्याची सतत धडपड सुरू असायची आणि त्यातून आणखीनच त्रास, कष्ट, दमणूक.....
काही कालांतराने असे दिसून आले, की एवढे कष्टी आपण का होतो आणि असे करून काय मिळते? कठोर प्रश्न, मुळाचे प्रश्न विचारणे भाग पडते...कार्य, जबाबदारी, मर्यादा, सैय्यम, आपुलकी, तटस्थ, स्वतःचे असे काहीसे, फरफट, क्षमा, सिद्ध, वेग, प्रगती, नुसते बघणे, तिथेच असणे, पळून न जाणे, न्यूनपणा न वाटून घेणे, शांतीने करत राहणे....
असे आहे सर्व काही. इथून पुढे मार्ग स्पष्ट आहे, असा नाही. तस मी ठामपणे मांडत नाही आहे काही.
आहे ते आहे. येणार ते येणार. आणि जाणार ते जाणार.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home