Wednesday, November 12, 2025

श्री

श्री 

आपल्या मनासाठी सारे आतील क्रिया बदलणाऱ्या असतात, किंबहुना बदल होणे म्हणजेच "मन" असण्याचे चिन्ह आहे. जे गुण भगवंताच्या माध्यमातून येऊ पाहतात, तेच मन घडवतात, ते दृश्याचा भास निर्माण करतात, तेच आपल्याला परावलंबी करतात आणि तेच विचार चक्र निर्माण करतात. त्यातूनच एक स्वभाव होतो, ज्याच्यात बरेच घटक सामील असतात आणि ते सूक्ष्मापासून ते स्थूलपर्यंत संबंधित राहतात. त्यामुळे निर्माण होणारे गूढ प्रश्न आणि त्यांचा शोध आणि शांत होण्याची गरज. 

वरील क्रियेमुळे गोंधळ मनात होऊ शकतो. आपण असल्याचा भास होतो आणि हालचाली किंव्हा तात्पुरतेपण, हे सुद्धा जाणवते. म्हणजे आपल्या मर्जीने काही होत नसते, हे ओघाने ओळखता येते. पण त्याचे तात्पर्य आपण "भीती" अशी भावना निर्माण करतो. ती बुद्धीच्या स्वभावामुळे होते. 

असे म्हणतात की स्वभाव फार चिवट असतो, म्हणून बुद्धीला आपण खूप घट्टपणे धरून असतो. ती _जे दाखवेल_ त्याला आपण मुल्य देऊन, त्या आधारे सर्व भावना आपण स्थित करतो. म्हणजे जर - तर च्या प्रकारात वावरून आपल्या पदरी तात्पुरतेपण येतं. 

ह्याचा मार्ग असा असू शकतो, की सत्य काय आहे, ते पचवणे. ह्याचा असाही अर्थ होतो, की आपला व्यवहार (ज्यात हेतू असतो) तो सर्व "खोटा" मानायला हवा...म्हणजे स्वतःवर त्याचे परिणाम ओढून घेणे, हे हिताचे नसावे. व्यवहारात आपण जे स्मरणाचे रूप प्रज्वलित ठेवतो, त्यातून आपण अधिक गुंतत राहतो आणि तळमळ सोसतो. 

ज्या पद्धतीने आराखडा बुद्धी मांडू इच्छिते, असे समजून की ती स्वतंत्र आहे आणि म्हणून पूर्ण ताबा तिच्या हातात आहे आणि ती म्हणेल तसंच होऊ पाहील... हे खोटे ठरते. मूळ प्रश्न जो आहे, तो वृत्तीला येऊन थांबतो...की "मी" ह्या शक्तीच्या रूपातून आपण असे चक्र निर्माण करतो, की त्यातून कष्ट पदरी पडत राहते. माझा आराखडा (logic) अर्धवट राहते. त्यात ज्या पद्धतीने आपण विचार करतो, अपेक्षा ठेवतो, तर्क लढवतो, ते तात्पुरते असतात, शाश्वत नसतात. 

म्हणून भगवंतावर श्रद्धा वाढवणे हा मार्ग पक्का ओळखायला लागतो. ते अपरिहार्य आहे, जबाबदारी नाही की logical नाही. ते बस आहे तसे. 

आपण कोण आहोत अस्तित्वात, हे ओळखावे...जो प्रवास ठरू शकेल.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home