श्री
श्री
ठरवण्याची, वेगळेपणे विषय मांडण्याची, स्पष्टीकरण देण्याची, कुठलीतरी भूमिका घेण्यासाठी, कुठल्या चष्म्यातून अर्थ लावला जात आहे, हे ओळखण्यासाठी - घाई करू नये असे मला वाटते. किंबहुना कुठलीच क्रिया, विचार, भावना वरील हेतूवरून उमटता कामा नये. मला काही माहित नसलं, तरी बेचैन होण्याची गरज का करून घ्यावी?
मी - ही कार्यातून निर्माण झालेली संकल्पना आहे. त्याचा एक भाव आहे, रूप आहे, आकार आहे, संबंध आहे. तरीही हे जाणून घेऊन सुद्धा, ते सिद्ध होण्यासाठी किंव्हा विषय म्हणून मांडता येत नाही किंव्हा तसे त्याच्याकडे बघू नये. हे dnyan विषय प्राप्तीसाठी न ठरता, आत परिवर्तन घडण्यासाठी आहे, सत्य बनण्यासाठी आहे. त्यासाठी भगवंत आपल्याला हवा असायला लागतो. तो भावनेने आपल्यास होतो, म्हणजे भावनेने मन परिवर्तन पावते. अंतर्मुख होणे, ही भावनिक गोष्ट आहे. परिवर्तन होण्यास हेतू लागू नये.
"मी विचार करतो किंव्हा भावना जाणवून घेतो", असे म्हणणे देखील मर्यादित ठरते. वास्तविक विश्लेषणासारखे गोष्टी माहित होतात, पण परिवर्तन झाल्यामुळे त्या शुद्ध स्मरणांचा "वापर" मर्यादित व्यवहारात करण्याची गरज राहत नाही.
सर्वांना मदत करा आणि सर्वांवर भरपूर प्रेम करा, असे संतांचे म्हणणे आहे. भगवंत कल्पवृक्ष आहे - त्याची शक्ती. शक्तीचे कार्य चक्र आहे. जे काही पेरू, तसे फळ प्रकट होते. म्हणून प्रपंचाचे परिणाम कसेही जरी असले, तरीही भगवंताची आठवण सतत हवी.
आपण वेगळे आहोत, ह्या भ्रमाला आपण घट्ट पकडून ठेवतो आणि त्यातून भिती निर्माण होते. असंख्य क्रियेमुळे आपल्याला परिस्थिती भासते आणि स्मरण होते. पुढील दगड खरा की विचार - तसं पाहिलं, तर दोन्ही निर्मितीतून आले आहेत आणि साखळीत ओवले गेले आहेत. आपण जसे दगड नाही, तसे विचारांच्याही पलीकडे स्थिर असतो.
तरीही हा अनुभवाचा भाग आहे. तो अनुभव हवा, असे वाटायला पाहिजे. आणि अनुभव विषय नाही. म्हणजे माहीत झाले तरी प्रारब्ध किंव्हा भोग असणार आणि कालवाकालव होईल. पुढे काय होईल आणि फळ काय असेल, हे भगवंतावरच अवलंबून असते. तिथे माझे व्ययक्तिक अध्यात्मिक dnyan जरी असले, तरीही त्यातून भोग टळत नसतात. जन्म घेतला तर भोग आलेच, परिस्थिती आली, विचार आले, भावना आल्या, भाव आला, संबंध आला, परिणाम आले....श्रद्धा हवी.
विचार शांत होणे आले. विचार प्रकरण किचकट करू शकतात. विचारात हेतू असतो. प्रत्येकजण प्रश्न घेऊन आला असतो , आणि तो असू द्यावा...कारण त्यातूनच जाणीव शुद्ध होत राहण्याचा मार्ग निघून येतो.
हरि ओम.
Shree
Every question need _not_ have an output as a physical form, I think. Questions may arise, as something "stand alone" entities. Those are mysterious and there is no direct relationship between space - time and a question. Neither are all questions required to generate a direct form in some record time.
I feel that a question may not have a direct justifiable expression in a form and that too need not be explained.
In the rush for having an instantaneous answer to a question, what we create is a "labyrinth" of experiences.
Multitasking, virtual languages have created enormous "fuzzy" variables. It is, I think, not a "job or a duty" to align ourselves with this fuzziness. This may appear as an arrogant stance for some people but it is ok. I am not sure if i could survive by taking this position myself!
Most communication or information seems to appear in virtual fuzzily integrated environments. This is a tricky scenario, that all behavioural logic is getting interlocked with this fuzzy environment. And that is shaping an identity.
It is not a question of this or that. It is not a question of relating this to that. It is a question of remaining sane and discovering what is sanity to you.
Hari Om.

0 Comments:
Post a Comment
<< Home