श्री: खेळ मांडला
श्री: खेळ मांडला
आपण इथे, ह्या जगात का आलो आहोत हे
आपल मुळ स्वरूप ओळखण्यासाठी. अशी परिस्थिती का निर्माण होत राहते – ह्याला ठोस अस
कारण नाही – कदाचित भगवंत आहे म्हणून वृत्ती उमटतात आणि आपली बुद्धी, मन आणि शरीर
तैय्यार होतं. ते येतं, घडत, बदलत राहत आणि मावळत सुद्धा आणि त्या बरोबर जगाच
अस्तित्व येतं आणि मावळत. समुद्राच्या लाटा ज्या पद्धतीने येतात आणि जातात पण
समुद्र मात्र तसाच राहतो, त्या प्रमाणे वृत्ती येत राहतात पण तरंगशुन्य
सागराप्रमाणे भगवंत तसाच राहतो.
वृत्ती ह्याला आपण सत्वरजतमात्मक
प्रकृती म्हणू शकतो. वृत्ती कुठलाही प्राण आणि कुठलाही आकार तैय्यार करू शकते
ज्याला आपण परिस्थिती म्हणतो. आपल्या बाबतीत सांगायच झालच तर वृत्ती बुद्धी, मन
आणि शरीर मध्ये परिवर्तीत होते. वृत्तींचा प्रभाव आपल्यावर होत राहतो आणि तो असा
कि बदल, द्वैत रचना, जग, परावलंबन, अश्या अनेक अनुभवांना सामोर जाव लागत. अनुभव
होणे म्ह्णजे “भाव” असणे म्ह्णजेच कि अस्तित्व असणे.
आपल अस्तित्व आहे आणि ते पूर्णपणे
भगवंतच्या इच्छेवर घडत राहते. हा सर्व “खेळ” भगवंताचा आहे, त्याने रचलेला आहे,
त्या मध्ये एक रसायन म्हणजे “आपण”! It is all an incidental aspect of existence.
तर आपल्याला हा खेळ भगवंताने
खेळायला दिला आहे, ते सोडून “दुसर” अस कुठलही स्थान नाही. खेळ मांडला आहे, आणि जो
पर्यंत तो पूर्ण होत नाही, तो पर्यंत आपल्याला खेळायला लागतोच. खेळ पूर्ण होणे
म्हणजे आपण भगवंताकडे पोहोचणे; आपण भगवत्स्वरूप होणे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home