श्री: स्वभाव
श्री: स्वभाव
जग सुधारणे म्हणजेच अंतःकरण
सुधारणे किवा उमटणाऱ्या वासना स्थिरावणे. अस दिसून येईल कि वासनामुळे जग निर्माण
होत किवा “निर्मिती” हि एक क्रिया आहे जि एका शक्तीतून उद्भवते. आपण अशेच का, अशे
का घडतो, का अवलंबून राहतो आणि कशे अनुभव घेतो वगैरे – हे सर्व प्रश्न ह्या
निर्मितून उद्भवतात – किवा एका भगवंताच्या अस्तित्वामुळे. आपल्या वृत्तीचा स्वभाव,
अनुभव आणि परिस्थितीचा अर्थ निर्माण करत. ह्याचा अर्थ कि परिस्थिती मुळात निर्माण
झालेली आहे – त्याच तस स्वतंत्र अस्तित्व किवा स्वभाव काहीच नाही आहे. विश्वाचा
स्वभाव जो आपल्याला जाणवतो, त्याच बीज आपल्याच वासनेत दडलेल आहे. जशी वासना तशे
विषय आणि तशी परिस्थिती आणि त्यातील अनुभव (मन आणि बुद्धी). बदल करायचाच असला तर
वासना शांत करणे किवा त्यांना समजून घेणे महत्वाच ठरेल.
वासना म्हणजे आपण नाही (आत्मा
नाही) आणि वासना उद्भवते आत्माच्या अस्तित्वामुळे. प्रत्येक “वस्तू” चा स्वभाव
ठरतो किवा मुलभूत असतो किवा प्रकट होतो. स्वभाव म्हणला तर अस्तित्व आल आणि त्यामध्ये
भावना आल्या आणि संबंध आले. वास्तू ही उगाच नसते – वस्तूला काहीतरी निर्माण करते –
तिला आपण वासना म्हणतो किवा शक्ति.
भगवत वस्तूचा स्वभाव असा दिसून
येतो कि त्यातून अनंत वासना, विश्व निर्माण होत राहतात पण मुळ भगवत वस्तू तशीच
राहते. त्या स्वभावाला आपण ज्ञान आणि कार्यक्षमता म्हणू. बी जमिनीत पेरून त्या गुणधर्मानी
झाड येणारच – तसचं भगवन्तामुळे वासना आणि विश्व निर्माण होत राहणार. त्यामध्ये
सूक्ष्म आणि स्थूल शक्तीचा प्रभाव होत राहणार आणि विविध आकार निर्माण होत राहणार.
ते सर्व येणार आणि मावळणार. त्यातून आणखीन वेगळे आकार येणार. तर ह्या सर्व
घडामोडींमध्ये स्थिर असलेली एकही वस्तू दिसून येत नाही आणि कुठल्याही वस्तूचा ठोस
मूळ शोधून काढता येत नाही. स्थिरपणा येणे लिवा मूळ शोधणे हा बुद्धीचा अट्टाहास
असतो - त्यातून वासना काही शांत होत नाही.
त्याला वेगळा मार्ग पत्करायला
लागतो आणि तो म्हणजे भगवंताच नामस्मरण -
वाणीतून किवा विचारातून किवा भावनेतून किवा कार्यातून. आणि कुठलाही मार्ग निवडला
तर तो सगळ्यांवर प्रभाव टाकतो आणि पूर्ण विश्व सामावून घेतो. ह्याचाच अर्थ कि सर्व
काही “एकच” सत्य आहे, जे आपल्याला जाणून घ्यायचं.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home