Monday, June 26, 2023

श्री: साप-शिडी

 

श्री: साप-शिडी

कार्य घडतात, परिस्थिती उद्भवतात, वर-खाली प्रकरणे होतात, सोंगटी पडते, कधी एक, तर काही सहा. एक किवा सहा त्यावरून चांगल कि वाईट हे सांगता येत नाही कारण कुठल्याही अंकावरून (निर्णयाने) शिडी लागते किवा सापही लागू शकतो! त्यावरून आपण पुढे जातो किवा खूप मागे येतो. त्यावरून आपण स्वतःच कर्तृत्व ठरवत बसतो! किवा साप “न येण्याचा” आटोकात प्रयत्न  करतो; किवा नेहमीच शिदि पाहीजे असा अट्टाहास धरत राहतो! थोडक्यात दुखी होतो. आपण स्थिर कधीच नसतो; म्हणून कधी-कधी शिडी किवा साप हातात लागतात. “शिडी”, “साप” किवा “अस्थिर” राहणे हा मनस्थितीचा परिणाम आहे. आपली वृत्ती ठरवते कि शिडी काय, साप काय, पुढे काय, मागे काय, चढण काय, उतार काय वगैरे. वृत्ती वरून सोंगट्या हलतात  - आणि कुठली सोंगटी पाहिजे - हे देखील बुद्धीच्या ताब्यात नसत! पण सर्व काही वृत्ती करत राहतात हा सर्व खेळ!

हे माहिती असल्यास, वृत्ती शांतपणे बघितली कि ती निघून जाते – त्याचा परिणाम आपण स्वतःवर करून घेत नाही – त्यातून काही कोड सोडवण्याची प्रतिक्रिया आपण करत नाही – किवा आपण वृत्तीतून विचार उमटू देत नाही. हे शक्य तेव्हाच घडू शकतं जेव्हा एका “शक्तीची” जाणीव आपल्याला होते. ती शक्ति कार्यशील असतेच, क्रिया सतत घडवते आणि ज्ञानमय असते.

आपल्याला परिस्थिती साप-शिडीची रचना वाटते – आपण सतत गुंतलेलो असतो आणि घाबरतो. मुळात सर्व काल्पनिक असल्यामुळे आपण गती नाही, किवा साप नाही किवा शिडीही नाही. सर्व भ्रम आहे. आपण नाही तर गती नाही किवा कुठलीही विश्वातील वस्तू नाही. आपण आहे तर सर्व विश्व आहे, नाहीतर एकच भगवंत आहे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home