श्री: श्रद्धा
श्री: श्रद्धा
स्वतःच्या जीवनातल्या घडामोडीचा
विचार केला तर दिसून येईल कि त्रास आपण स्वतः ओढून घेतलेला आहे. त्याच कारण कळणे
महत्वाच आहे अस मला वाटत.
स्व म्हणजे शक्ति जिची सूक्ष्म आणि
स्थूल बाजू आहेत. आपल्याला स्थूल बाजूचेच आकलन साधारणपणे होत राहत. त्या स्थूल
बाजूचा स्वाभाव म्हणजे बदल, परावलंबन, आकार, भीती, बुद्धीचा स्वभाव वगैरे. आपण
दृश्यातच गुरफटून जातो.
दुसर अंग म्हणजे सूक्षम बाजू जे
बदलत नाही, एकच असते, जिला स्थळ आणि काळाच बंधन नाही आणि ती दृश्यातीत, अनंत,
अनाहत, अचित्य असते. तिथे आपली सध्याची पोच नाही.
ह्या दोन स्थितीच्या मधली स्थिती अशी
कि जिकडे आपल्याला वृत्ती दिसतात, प्राण दिसतो. हेही सहजासहजी आकलनाच्या पलीकडे
असत.
सांगण्याचा तात्पर्य असा कि आपल्यावर
बर्याच स्थितींचा प्रभाव पडलेला असतो ज्यावरून आपण विचार करत राहतो आणि भावना
व्यक्त करत राहतो आणि सतत प्रश्नांमध्ये अडकलेलो राहतो. आपल्याला वाटत राहत कि
उत्तर – शाश्वतीची, भीती घालवण्याची, शांत होण्याची – सर्व काही दृश्यामध्ये
सापडतील. आपण अशेच का आहोत, काय करायला हव, आपला अभिमान, आपला न्युनगंड असल्यास, अशाश्वतीची
जाणीव आणि त्याला प्रतिउत्तर देण्याचा अट्टाहास, राग, लोभ – सर्व काही ह्या दृश्यामध्ये
गोष्टी “सडलेल्या” असतात.
हे जरी कळल तरी आपला अट्टाहास
राहतो कि सूक्ष्माचा स्वभाव कळून कळणे, जेणे करून त्याचा प्रभाव आपल्याला कसा आजमावता
येईल दृश्याच्या दुनियेत. तर ते काही साध्या होत नाही कारण हा विचाराचमुळी आपली
स्थूल बुद्धी करत आहे (only
logical dimension) म्हणून
आपला प्रयत्न देखील लटका पडू शकतो.
सूक्ष्माच रुपांतर आपल्यावर आणि
आपल्या जीवनावर कसा होतो ते बुद्धीच्या गुणधर्मावरून सांगता येणार नाही – ते बरच “गूढ”
प्रकरण ठरत आणि म्हणून “श्रद्धा” ठेवायला लागते “आत उतरण्यासाठी”. श्रद्धा ठेवायला
लागते ती “शक्तीवर” जे सर्व विश्व चालवते आणि घडामोडी करून आणते. त्यामध्ये आपणही
होत राहतो आणि मावळतो.
श्रद्धा जशी वाढेल, तसतस आपण
सूक्ष्म बनत जातो. श्रद्धा ठेवणे आणि परिस्थिती – ह्याचा काहीही संबंध नाही. परिस्थिती
आपल्याला काहीही दृश्य दाखवते ज्याला तसा काहीही खरा सत्य अर्थ नसतो. परिस्थिती
कशीही असली तरीही आपण सूक्ष्म पातळीपर्यंत पोहोचू शकतो कारण सूक्ष्म होणे म्हणजे
वृत्ती शांत करणे. म्हणून बर्याच बौद्धिक विचार इथे काम करून शकत नाही. सर्व
वृत्ती शांत करणे शक्य आहे. श्रद्धा असावी.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home