Saturday, June 24, 2023

श्री: खोल उतरणे

 

श्री: खोल उतरणे

भगवंत म्हणजे शक्ति आणि क्रिया - विश्व अनंत काळ चालवण्याची. ह्या मध्ये बर्याच सूक्ष्म वृत्तीचा समावेश होत असतो, ज्यावरून आकार निर्मितीला येतात, काही काळ टिकतात, आणि विलयास जातात आणि दुसरीकडे नव्या प्रकारे परत “दृष्टीस” येतात. हे दृष्यमय जग एक अस्तित्वाची स्थिती आहे; अश्या अनेक स्तिथी असतात आणि एकमेकांचा संबंध सहाजिकच त्यांच्यामध्ये असतो. सर्व स्थिती घडवणारी “शक्ति” किवा “बदल” किवा “अनेकपणा” किवा “जाणीव” किवा “दृश्य” किवा “गती” ती एकाच सूक्ष्म भगवंताकडून उद्भवत राहते. सगळ्यांच्या पलीकडे ती सूक्ष्म, अनंत, अनाहत, अचित्य शक्ति ती असते म्हणून ती आपल्या बुद्धीला किवा मनाला जाणवणे कठीण जाते.

आपण त्या शक्तीकडून निर्माण होत राहतो आणि विलयास जातो. शक्ति खरी आहे, आपल त्या शक्तीला “चिकटणे” खरं नाही. शक्ति आपल्याकडून बर्याच बौद्धिक कल्पना, विचार, भावना, शरीर नर्माण करत राहते आणि त्यात आपण “उत्तर” शोधत राहतो. उत्तर शोधण्याच कारण अस कि आपण “भीती” बाळगतो आणि आपल्याला अस्तित्वाच सत्य स्वरूपाच आकलन पूर्णपणे झालेलं नसत. इथे गोंधळ उडतो स्वतःचा.

सर्व गोष्टींचा “उगन” वृत्ती मधून आहे आणि वृत्तीचा उगन भगवंता मधेच सिद्ध आहे. आपल्याला त्या सूक्ष्म मनाकडे जायच आहे – जाणे म्हणजे बनणे.

दृश्याच्या पकडीत राहणे किवा देहबुद्धीने विचार करत राहणे म्हणजे आपण अजून खूप स्थूल भूमेकेवरच आहोत आणि “वरच्या” किवा स्थूल बुद्धीतून विचार करत आहोत – तिथे भीती आणि चिंता आणि त्रास आणि अभिमान स्तीत असतात. The task is to go inwards till we reach (and become) subconscious where vibrations are seen or observed. तिथे वृत्ती वावरतात आणि जातात आणि आपल्याला जर शांत राहता आल, तर आपल्याला भगवंत देखील दिसतो.

तस आपल्याला काहीच करायच नसत  - प्रयत्न आहे वृत्ती शांत करणे  - ते कुठल्याही माध्यमातून करा – विचार, मन, कार्य...”आत खोल जात राहणे हे गरजेच आहे”.

आपण वरच्या भूमिकेवरच जगत राहतो. “जग” किवा “विश्व” हे भासणे म्हणजे आपण वरवरचे जगतोय; स्थूल आहोत. मग प्रश्न पडत असतात कि एखादी गोष्ट का, कुठे, कशी, कुणी, कधी घडवली आणि स्वतःला त्रास करून घेतो. परिस्थिती त्याला उत्तर नाही. उत्तर मिळाल तरी समाधान होत नाही; आपली वृत्ती बदलतच राहते; आपल्याला गोष्टी खर्या वाटत राहतात; आपण घाबरतो; आपल्याला अशाश्वती बेचैन करत राहते...हा सर्व दृश्याचा पगडा आहे मनावर. There is no such thing as achieving perfection in the world of motion or manifestation – things will appear incomplete, we will be engaged into thinking and that is where the problem lies. We will try to fix something and the problem will still persist. It is the nature of the manifested world to be in motion. The motion also makes us and it forms the ego. Ego is a trap and a loop of thoughts and it creates attachment to the changing forms. Therefore, we need to awaken from this tendency of imagination. imagination is born from vibrations and that creates movement and conditions of change and dependence. आपण आत खोल उतरणे महत्वाच आहे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home